शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

'माया' आटली?... 'टाळी'साठी काँग्रेसला मायावतींनी अट घातली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 20:04 IST

देशातील समस्या सोडविण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच विरोधी पक्षांनी महाआघाडीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली केली आहे

नवी दिल्ली :  देशातील समस्या सोडविण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच विरोधी पक्षांनी महाआघाडीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली केली आहे. यामध्ये काँग्रेससह अन्य 19 पक्षांचा समावेश आहे. मात्र गेल्या काही दिवसांतील घडामोडीवरून महाआघाडीमध्ये प्रत्येक पक्ष आपला स्वार्थ आणि अस्तित्व दाखवत असल्याचे दिसून येत आहे. महाआघाडीतील एक असेलेल्या मायावती यांनी आपल्याला सन्मानजनक जागा मिळाल्या तरच काँग्रेसबरोबर आघाडी करणार असल्याचे आज स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता  महाआघाडीत बिघाडीची चिन्हे दिसू लागली आहेत. दुसरीकडे अविश्‍वास प्रस्तावाच्या निमित्ताने विरोधकांच्या एकीचा फुगा फुटण्याचीच चिन्हे दिसल्याने दुसरीकडे भाजपाच्या गोटात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या असतील.  

मोदी विरोधात एकत्र येणाऱ्या महाअघाडीमध्ये बिघाडी होत असल्याचे दिसून येतेय.  बसपा प्रमुख मायावती यांनी स्पष्ट केले आहे की, जर व्यवस्थित जागा मिळाल्या तरच आघाडीसाठी तयार आहे. छत्तीसगढ, मध्यप्रदेश आणि राज्यस्थानमध्ये होणाऱ्या निवडणुकीत कांग्रस-बसपा आघाडीचे प्रयत्न सुरु आहेत. आशामध्येच मायावती यांनी केलेले हे वक्तव्यावरुन कांग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असेल.  आज माध्यमांशी बोलताना मायावती यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्याबरोबरच भाजपावर कडाडून टीकास्त्रही सोडले. पंतप्रधान पदाच्या शर्यतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार देखील असल्याचा दावा राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी केला आहे.

फक्त राहुल गांधीच नव्हे तर विरोधी पक्षांमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, आणि बसपच्या प्रमुख मायावती हे देखील या शर्यतीत असल्याचा दावा राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी केला आहे. तेजस्वी यादव यांच्या या दाव्यामुळे कॉंग्रेस आणि राहुल गांधी यांच्या स्वप्नांना मात्र सुरुंग लागेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत 2019च्या निवडणुकीत जर काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला तर राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, असा ठराव करण्यात आला होता. काँग्रेसच्या या ठरावावर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.   

टॅग्स :congressकाँग्रेसmayawatiमायावती