नवी दिल्लीः बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विरोधकांच्या काश्मीर दौऱ्यावरून त्यांनी निशाणा साधला आहे. तसेच आंबेडकरांनाही जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 मान्य नव्हतं, असंही मायावती म्हणाल्या आहेत. विरोधकांचं जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर जाण्यासारखं पाऊल केंद्रातील सत्ताधाऱ्यांना संधी देण्यासारखं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमीच देशातील समानता, एकता आणि अखंडतेच्या बाजूनं राहिले आहेत.जम्मू-काश्मीरला विशेष दर्जाच्या देणाऱ्या कलम 370च्या ते कधीही बाजूनं नव्हते. त्यामुळेच बहुजन समाज पक्षाच्या खासदारांनी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवण्याला समर्थन दिलं आहे. देशाचं संविधान लागू होऊन जवळपास 69 वर्षांनंतर 370 कलम हटवण्यात आलं आहे. आता तिकडची परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी काही वेळ अवश्य लागणार आहे. यासाठी थोडा वेळ देणं गरजेचं आहे. ज्याचं न्यायालयानंही समर्थन केलं आहे.काश्मीरमधील परिस्थिती पाहता अशावेळी काँग्रेस आणि अन्य पक्षाच्या नेत्यांकडून काश्मीरमध्ये जाणे म्हणजे केंद्र आणि जम्मू काश्मीरमधील राज्यपाल सत्यपाल मलिक यांना राजकारण करण्यासाठी संधी देणे असा निर्णय नाही का? त्याठिकाणी जाण्यापूर्वी थोडा विचार केला असता तर योग्य राहिलं असतं असा टोला मायावती यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षातील नेत्यांना लगावला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही जम्मू-काश्मीरमधलं कलम 370 मान्य नव्हतं- मायावती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 16:05 IST