मौलवी मोहम्मद हनिफ केरळमधून अटकेत
By Admin | Updated: August 15, 2016 06:44 IST2016-08-15T05:11:12+5:302016-08-15T06:44:39+5:30
मुस्लीम तरुणांना इसिसमध्ये सहभागी करण्यासाठी प्रवृत्त करणारा मौलवी मोहम्मद हनिफला शनिवारी केरळमधील कन्नुर जिल्ह्यातून त्याला अटक केली.

मौलवी मोहम्मद हनिफ केरळमधून अटकेत
मुंबई : मुस्लीम तरुणांना इसिसमध्ये सहभागी करण्यासाठी प्रवृत्त करणारा मौलवी मोहम्मद हनिफला शनिवारी केरळमधील कन्नुर जिल्ह्यातून त्याला अटक केली. गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. न्यायालयाने त्याला २० तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.
धर्मपरिवर्तन आणि इसिससाठी नागरिकांचे ब्रेन वॉश केल्याप्रकरणी केरळ एटीएसने अर्शिद कुरेशी आणि रिझवानविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.
त्या पाठोपाठ केरळमधील अब्दुल कदार यांच्या मुलगा अश्फाक याचे मतपरिवर्तन करून त्याला
इसिसमध्ये सहभागी केल्याप्रकरणी नागपाडा पोलिसांनी अर्शिद, रिझवान, मोहम्मद हनिफ आणि रशीद अब्दुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
यातील अब्दुला याने देश सोडून इसिसमध्ये सहभागी झाल्याची माहिती समोर येत आहे. हनिफने केरळमधील अश्फाकसह २१ तरुणांचे मतपरिवर्तन करून त्यांना इसिसमध्ये सहभागी होण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात येत आहे.
मूळचा केरळ येथील रहिवासी असलेल्या हनिफला अश्फाक भेटत होता. हनिफनेच कुरेशी आणि रिझवानसोबत अश्फाकची भेट घालून दिली होती. केरळसहीत मुंबईतील डोंगरी येथे असलेल्या
डॉ. झाकिर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनच्या कार्यालयात त्यांनी भेट घेतली होती.
या प्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत. या प्रकरणी अधिक चौकशीसाठी कुरेशी
आणि खानची कोठडी मिळावी, म्हणून गुन्हे शाखेने पाठपुरावा सुरू केला आहे. (प्रतिनिधी)