शौचालय नसलेल्या घरात निकाह होणार नाही- मौलाना मदनी
By Admin | Updated: February 19, 2017 19:02 IST2017-02-19T19:02:51+5:302017-02-19T19:02:51+5:30
शौचालय नसलेल्या घरात निकाह पढायला जाऊ नका, असा आदेशच जमियत उलामा-ए-हिंद चे सेक्रेटरी जनरल मौलाना महमूद मदनी यांनी मौलवी आणि मुफ्तींना दिला

शौचालय नसलेल्या घरात निकाह होणार नाही- मौलाना मदनी
ऑनलाइन लोकमत
हरियाणा, दि. 19 - शौचालय नसलेल्या घरात निकाह पढायला जाऊ नका, असा आदेशच जमियत उलामा-ए-हिंद चे सेक्रेटरी जनरल मौलाना महमूद मदनी यांनी मौलवी आणि मुफ्तींना दिला आहे. हरियाणा, हिमाचल आणि पंजाबमध्ये मुस्लिमांच्या निकाहसाठी शौचालयाची अट घालण्यात येणार असून, ही अट सर्व राज्यांमध्ये लागू केली जाईल, असं वक्तव्य जमियत उलामा-ए-हिंदचे सेक्रेटरी जनरल मौलाना महमूद मदनी यांनी केलं आहे.
मला असे वाटते की देशातील सर्व धर्माच्या नेत्यांनी हा निर्णय घ्यायला हवा की, शौचालय नसेल अशा घरात धार्मिक विधी करू नये. मदनी यांनी स्वच्छतचे महत्त्व विषद करताना लोकांनी जास्तीत जास्त शौचालयाचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे.
स्वच्छता ही दोन प्रकारची असते. एक अंतर्गत स्वच्छता आणि बाह्य स्वच्छता. जर आपले शरीर स्वच्छ असेल तरच आपण स्वच्छता ठेवण्यात यशस्वी होऊ, असंही ते म्हणाले आहे. राज्यसभेचे माजी खासदार मदनी यांनी खानापारामध्ये आसाम कॉन्फरन्स ऋफ सॅनिटेशन (ASCOSAN) 2017च्या उद्घाटनावेळी ही घोषणा केली.