मॅट्रिक्स प्रकरण - जोड

By Admin | Updated: July 31, 2015 23:03 IST2015-07-31T23:03:13+5:302015-07-31T23:03:13+5:30

Matrix Case - Pairing | मॅट्रिक्स प्रकरण - जोड

मॅट्रिक्स प्रकरण - जोड

>फसवणूक झालेल्यांची यादी

मॅट्रिक्स इन्फ्रा इस्टेटच्या मोहात अडकून प्रेमदास गणवीर यांची ८ लाख ८३ हजार, सुचित्रा लोहकरे यांची २ लाख ६१ हजार, धर्मेंद्र यादव यांची ३ लाख ५ हजार, अनुर्ध्वज रंगारी यांची २ लाख ९८ हजार, हेमंत करमरकर यांची १ लाख ५३ हजार, सुनील खोब्रागडे यांची ८६ हजार, नलिनी कुळकर्णी यांची २ लाख ८० हजार, अमित रेवतकर यांची ५ लाख ५८ हजार, सविता गोन्नाडे यांची ३ लाख ३६ हजार, जयश्री चोले यांची ३ लाख ७७ हजार, संजय रामटेके यांची ६५ हजार, संजय सोमकुवर यांची ८० हजार, नंदकिशोर साबळे यांची २ लाख ९० हजार, सुरेश ब्राह्मणकर यांची २ लाख ९५ हजार, राजेश चेटुले यांची १ लाख ७८ हजार, शेवंताबाई रावते यांची ३ लाख १२ हजार, नरेंद्र चोले यांची २ लाख ३० हजार, विलास कापगते यांची १ लाख ८३ हजार, प्रफुल्ल कानांनी यांची १६ लाख ८० हजार आणि भीमराव खोब्रागडे यांची २ लाख ८० हजाराने फसवणूक झालेली आहे.
फसवणूक झालेल्यांमध्ये मध्यमवर्गीय, नोकरदार आणि सेवानिवृत्तांची मोठी संख्या आहे. स्वत:च्या घराचे स्वप्न पाहून त्यांनी या कंपनीकडे आपल्या मेहनतीच्या पैशाचा भरणा केला होता. या कंपनीने अनेकांना चेकने पैसे परत केले. परंतु कंपनीच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने त्यांचे चेक परत आले.
न्यायालयात सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील प्रशांत भांडेकर, प्रशांत साखरे, लीलाधर शेंद्रे यांनी काम पाहिले. सहायक पोलीस उपनिरीक्षक के. एन. गड्डिमे हे या प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत.

Web Title: Matrix Case - Pairing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.