मांढळ येथे गणित शिक्षकांची कार्यशाळा
By Admin | Updated: August 31, 2015 21:30 IST2015-08-31T21:30:32+5:302015-08-31T21:30:32+5:30
(फोटो)

मांढळ येथे गणित शिक्षकांची कार्यशाळा
(फ ोटो)मांढळ येथे गणित शिक्षकांची कार्यशाळामांढळ : स्थानिक महामायादेवी विद्यालयाच्या सभागृहात कुही तालुका गणित अध्यापक मंडळाच्यावतीने गणित शिक्षकांच्या कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मुख्यायापक विनय गजभिये होते. मार्गदर्शक म्हणून पुरुषोत्तम पंचभाई उपस्थित होते. यावेळी गणित मंडळाच्या विविध योजना, विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाबाबत आवड निर्माण करणे, त्यांना मनोरंजनात्मक पद्धतीने शिकविणे, त्यांच्या प्रश्नांची सोप्या भाषेत उत्तरे देणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. इयत्ता दहावीच्या परीक्षेत १०० पैकी १०० गुण प्राप्त करणाऱ्या नरहरी वाडीभस्मे व अतुल घायवट या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. प्रास्ताविक डंभारे यांनी केले. संचालन पिंपरे यांनी केले तर, विजय पुडके यांनी आभार मानले. यशस्वितेेसाठी सज्जन पाटील, मधुकर राऊत, सी.पी. मेश्राम यांच्यासह अन्य शिक्षकांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)***(फोटो)भुते कॉलेजच्या आवारात वृक्षारोपणसाळवा : स्थानिक सहदेव भुते महाविद्यालयाच्या आवारात नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढून पर्यावरणाबाबत जनजागृती केली. अध्यक्षस्थानी प्रा. प्रांजली मेहर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सुनील तिरपुडे, प्रा. रोशन वासनिक, प्रा. मंगला शेंडे, प्रदीप गाढवे, कमलाकर अवैकर, रोशन डहाके, नीलेश भुते आदी उपस्थित होते. यावेळी अतिथींसह विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करून रोपट्यांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली. (वार्ताहर)***(फोटो)डोंगरमौदा येथे योग शिबिराची सांगताकुही : तालुक्यातील गौतम विद्यालयात योगा व प्राणायाम शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भारत स्वाभिमान समितीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप काटेकर, मुख्याध्यापक बी. एम. नानोटे, दीपक येवले, दत्तू चौधरी यांनी विद्यार्थ्यांना योगा व प्राणायामाचे प्रात्यक्षिकांद्वारे प्रशिक्षण दिले. पतंजली योग समितीच्या तालुका प्रभारी शोभा गांगलवार यांनी वनौषधींची ओळख करून देत त्यांची उपयोगिता सांगितली. जगदीश राठोड यांनीही मार्गदर्शन केले. या शिबिरात ४०० विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रास्ताविक जी. यु. खोब्रागडे यांनी केले. संचालन भालचंद्र गांगलवार यांनी केले तर बी. एम. नंदेश्वर यांनी आभार मानले. (तालुका प्रतिनिधी)***