शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये भीषण अपघात! वलसाडमध्ये कार-ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू; कुंभघाट परिसरात शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 19:00 IST

गुजरातमध्ये झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Gujarat Accident:गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील कपराडा तालुक्यात शुक्रवारी क्षणार्धात एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा अंत झाला. कुंभ घाटातील एका धोकादायक वळणावर भरधाव ईको कार आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांसह एकूण ७ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण कपराडा परिसरात खळबळ उडाली असून अंबा जंगल गावावर शोककळा पसरली आहे.

भीषण धडक आणि कारचा चक्काचूर

मिळालेल्या माहितीनुसार, कपराडा येथील अंबा जंगल गावात राहणारे हे कुटुंब ईको कारने प्रवास करत होते. कार कुंभ घाटातील वळणावर आली असताना समोरून येणाऱ्या एका वेगवान ट्रकने कारला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, ईको कारचा अक्षरशः पत्र्यासारखा चक्काचूर झाला. धडकेचा आवाज इतका मोठा होता की, आसपासच्या नागरिकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली.

घटनास्थळी रक्ताचा सडा; मृत्यूचा आकडा वाढला

अपघातानंतरचे दृश्य अत्यंत भयावह होते. कारमधील ५ सदस्यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर २ जण रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत पडले होते. स्थानिक नागरिक आणि १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, नशिबाने त्यांची साथ दिली नाही. उपचार सुरू असतानाच त्या दोघांचीही प्राणज्योत मालवली. या अपघातातील मृतांची संख्या ७ वर पोहोचली आहे.

मदतीसाठी धावले हात

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. स्थानिक लोकांनी कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मोठी मदत केली. मृतदेहांची अवस्था पाहून उपस्थितांच्या डोळ्यांतही पाणी आले. पोलिसांनी मृतांचे देह शवविच्छेदनासाठी पाठवले असून अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

कुंभ घाट परिसर हा त्याच्या अवघड वळणांसाठी ओळखला जातो. या अपघाताने क्षेत्रात रस्ते सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. भरधाव वेग आणि वळणावरील अंदाज चुकल्याने हा भीषण अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Gujarat Accident: Seven of Family Die in Valsad Car-Truck Crash

Web Summary : A horrific car-truck collision in Valsad, Gujarat, killed seven members of one family. The accident occurred at a dangerous curve in Kumbh Ghat, Kaprada, leaving the community in mourning. High speed and misjudgement at the turn caused the crash.
टॅग्स :GujaratगुजरातAccidentअपघात