शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीपूर्वी CAA लागू करण्याच्या घोषणनंतर आसाममध्ये मोठं आंदोलन; उपोषण, सत्याग्रहाची घोषणा, ३० संघटना एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 11:59 IST

लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात CAA लागू करण्याच्या चर्चा सुरू आहेत. आता या विरोधात आसाममध्ये जोरदार आंदोलन सुरू झाले आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात CAA लागू करण्याच्या चर्चा सुरू आहेत. आता या विरोधात आसाममध्ये  जोरदार आंदोलन सुरू झाले आहे. ऑल आसाम स्टुडंट्स युनियनसह ३० हून अधिक गटांनी आसाममधील नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (CAA) विरोध करण्याची घोषणा केली आहे. AASU अध्यक्ष उत्पल शर्मा यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आसाम दौऱ्यादरम्यान ९ मार्च रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये १२ तासांच्या उपोषणासह आंदोलन केले जाईल. CAA विरोधात सर्वोच्च न्यायालयात अनेक खटले सुरू आहेत.

AASU अध्यक्ष उत्पल शर्मा म्हणाले की, CAA विरोधात सर्वोच्च न्यायालयात अनेक खटले सुरू आहेत आणि अशा परिस्थितीत त्याची अंमलबजावणी जाहीर करणे हा लोकांवर घोर अन्याय आहे.  आसामच्या जनतेने सीएए कधीच स्वीकारला नाही आणि जर त्याची अंमलबजावणी झाली, तर ते या दिशेने उचललेल्या प्रत्येक पावलाला विरोध करतील.

जातीपेक्षा पक्ष मोठा झाला का?; मनोज जरांगे पाटील मराठा नेत्यांवर संतापले

"सीएए विरोधी आंदोलन ४ मार्च रोजी प्रत्येक जिल्हा मुख्यालयात मोटारसायकल रॅलीने सुरू होईल आणि मशाल रॅली देखील काढण्यात येईल. जेव्हा पंतप्रधान ८ मार्चला आसाममध्ये येतील तेव्हा AASU आणि इतर ३० गट २०१९ मध्ये CAA विरोधी निदर्शनांदरम्यान पोलिस गोळीबारात मारल्या गेलेल्या पाच तरुणांच्या फोटोसमोर दिवे लावतील, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान ८ मार्चपासून आसामच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असतील, त्या दरम्यान ते काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात जंगल सफारी करतील, १७ व्या शतकातील अहोम सेनापती लचित बोरफुकन यांच्या १२५ फूट उंच पुतळ्याचे अनावरण करतील आणि पायाभरणी करतील. शिवसागर मेडिकल कॉलेज आणि ५.५ लाख रुपयांच्या गृहनिर्माण योजनेंतर्गत बांधलेल्या घरांचे पंतप्रधान उद्घाटन करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यापूर्वीच त्यांच्या भाषणात CAA च्या घोषणेबद्दल बोलले आहेत.

नागरिकत्व कायद्याबाबत शाह म्हणाले होते की, हा कायदा २०१९ मध्ये मंजूर झाला होता. यासंदर्भातील नियमावली जारी केल्यानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. सीएए हा देशाचा कायदा आहे, त्याची अधिसूचना नक्कीच काढली जाईल. CAA निवडणुकीपूर्वी लागू करणे आवश्यक आहे, त्यामुळे कोणीही यात गोंधळ करू नये. 

टॅग्स :BJPभाजपा