शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगाचा मोठा हलगर्जीपणा उघड, 89 लाख लोकांचा आधार नंबर सार्वजनिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 09:33 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने(मनरेगा)तील मोठा घोळ समोर आला आहे. आंध्र प्रदेशातल्या मनरेगा योजनेत नोंद असलेल्या जवळपास 89 लाख लोकांचा आधार डेटा आंध्र सरकारनं सार्वजनिक केला आहे.

नवी दिल्ली- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने(मनरेगा)तील मोठा घोळ समोर आला आहे. आंध्र प्रदेशातल्या मनरेगा योजनेत नोंद असलेल्या जवळपास 89 लाख लोकांचा आधार डेटा आंध्र सरकारनं सार्वजनिक केला आहे. द हिंदूच्या रिपोर्टनुसार, गुरुवार(26 एप्रिल) सकाळी हैदराबादेतल्या इंटरनेट सुरक्षा संशोधक कोडाली श्रीनिवास यांनी आधार नंबर लीक झाल्याची माहिती दिली. त्यानंतर लगेचच साइटवरून त्या नंबरांना ब्लर करण्यात आलं. आंध्र प्रदेशात बेनिफिट डिस्बर्समेंट पोर्टल(बीडीपी) मनरेगाशी संबंधित लोकांची मजुरी, सोशल सिक्युरिटीसह पेन्शनचा हिशेब ठेवते. राज्यातील 89 लाख 38 हजार 138 लोकांनी स्वतःचा आधार नंबर या योजनेबरोबर जोडला आहे. या सर्व लोकांचे नाव, गावाचं नाव, जॉब कार्ड नंबर, आधार नंबर वेबसाइटवर टाकण्यात आले आहेत.जवळपास या योजनेत 1 कोटी 2 लाख लोकांनी सहभाग नोंदवला आहे.  बेनिफिट डिस्बर्समेंट पोर्टल(बीडीपी)चे व्यवहार एपी ऑनलाइन सांभाळते. आंध्र प्रदेशमध्ये हे पहिल्यांदाच झालेलं नाही. कथित स्वरूपात हाऊसिंग कॉर्पोरेशनच्या लाभार्थ्यांचा आधार नंबर, त्यांच्या जातीची माहिती, बँक अकाऊंट आणि दुसरी माहिती सार्वजनिक करण्यात आली. याची माहिती कोडाली श्रीनिवास यांनी अधिका-यांना दिल्यानंतर वेबसाइटवरून आधार नंबर आणि व्यक्तिगत सूचना हटवण्यात आली आहे. जवळपास 45 लाख लोकांचे बँक अकाऊंट नंबर, रेशन कार्ड नंबर, जाती आणि इतर माहितीही वेबसाइटवर उपलब्ध आहे.द हिंदूच्या माहितीनुसार, कोडाली श्रीनिवास यांनी सांगितलं की, हे मूलभूत अधिकारांचं उल्लंघन आहे. राज्य सरकार पारदर्शकतेच्या नावावर लोकांची माहिती सार्वजनिक करते आहे. परंतु याचा दुरुपयोग राजकीय दल, व्यावसायिक संस्था आणि व्यावसायिक स्वतःच्या फायद्यासाठी करू शकतात. राज्याचे प्रधान सचिव विजयानंद यांनी हाऊसिंग कॉर्पोरेशनच्या वेबसाइटवरून होणा-या डेटा लीक प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनाही या गोष्टीची माहिती नाही. परंतु आधार डेटा बीडीपीवर उपस्थित आहे. विजयानंद यांच्या मते, राज्य सरकारनं गेल्या काही दिवसांपूर्वीच आंध्र प्रदेशमध्ये सायबर सिक्युरिटी ऑपरेशन्स सेंटरही सुरुवात करण्यात आली आहे. एका आठवड्यात सर्वकाही सुरळीत होणार असून, आम्ही पूर्णतः सावधानता बाळगली आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डAndhra Pradeshआंध्र प्रदेश