खडका येथे तरुणाची निघृर्ण हत्या

By Admin | Updated: March 23, 2017 17:19 IST2017-03-23T17:19:30+5:302017-03-23T17:19:30+5:30

नेवासाफाटा : नेवासा तालुक्यातील खडका येथे एका पन्नास वर्ष वयाच्या तरुणाची निघृर्ण हत्या करण्यात आली. बुधवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास परिसरातील नागरिकांना मृतदेह आढळून आला.

The massacre of a young man at the Khadka | खडका येथे तरुणाची निघृर्ण हत्या

खडका येथे तरुणाची निघृर्ण हत्या

वासाफाटा : नेवासा तालुक्यातील खडका येथे एका पन्नास वर्ष वयाच्या तरुणाची निघृर्ण हत्या करण्यात आली. बुधवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास परिसरातील नागरिकांना मृतदेह आढळून आला.
बाळू दौलत सोनकांबळे (वय ५०) हे मृताचे नाव आहे. नागरिकांनी नेवासा पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पाठविला. दोन दिवसापूर्वी या गावातील एका समाजाच्या स्मशानभूमीची समाजकंटकाने तोडफोड केल्यानंतर तिसर्‍या दिवशी मृतदेह आढळून आल्याची घटना घडल्याने या समाजामध्ये संतापाचे वातावरण आहे. स्मशानभूमीची तोडफोड करणार्‍याचा तातडीने तपास न केल्यास २७ मार्च रोजी नेवासा तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्याचा इशारा माजी सरपंच परवेझ पठाण यांनी दिला. (वार्ताहर)

Web Title: The massacre of a young man at the Khadka