मसूद अझरला अटक नाहीच फक्त ताब्यात घेतले
By Admin | Updated: January 15, 2016 10:37 IST2016-01-15T09:45:49+5:302016-01-15T10:37:51+5:30
पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझरला अद्यापी पाकिस्तानने अटक केलेली नाही.

मसूद अझरला अटक नाहीच फक्त ताब्यात घेतले
ऑनलाइन लोकमत
लाहोर, दि. १५ - पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझरला अद्यापी पाकिस्तानने अटक केलेली नाही. आम्ही अझर आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले आहे. त्यांना अटक केलेली नाही असे पाकिस्तानातील पंजाब प्रांताचे कायदामंत्री राना सानाउल्लाह यांनी सांगितले.
पंजाब पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने मसूद अझरला प्रोटेक्टीव्ह कस्टडीमध्ये घेतले आहे असे राना सानाउल्लाह यांनी डॉन न्यूजला सांगितले. बुधवारी संध्याकाळी मसूद अझरला पाकिस्तानात अटक झाल्याचे वृत्त आले होते. मात्र पाकिस्तानकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती.
पठाणकोट हल्ल्यासंदर्भात आम्ही अझर आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले आहे. पठाणकोट हल्ल्यातील त्यांचा सहभाग सिद्ध झाला तर आम्ही त्यांना अटक करु असे सानाउल्लाह यांनी सांगितले. राष्ट्रीय कारवाई कार्यक्रमातंर्गत जैश आणि अन्य दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई सुरुच राहील असे त्यांनी सांगितले.