मारुती, ह्युंदाईच्या कार विक्रीत वाढ; महिंद्रा, जीएमला फटकानवी
By Admin | Updated: December 2, 2014 00:08 IST2014-12-02T00:08:23+5:302014-12-02T00:08:23+5:30
देशातील सगळ््यात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडिया आणि ह्युंदाई मोटार इंडियाची नोव्हेंबर महिन्यातील विक्री उत्साहजनक वाढली,

मारुती, ह्युंदाईच्या कार विक्रीत वाढ; महिंद्रा, जीएमला फटकानवी
दिल्ली : देशातील सगळ्यात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडिया आणि ह्युंदाई मोटार इंडियाची नोव्हेंबर महिन्यातील विक्री उत्साहजनक वाढली, तर जनरल मोटार्सच्या विक्रीत तब्बल ३३.१ टक्क्यांची घट झाली.
मारुती सुझुकीची विक्री १९.५ टक्क्यांनी वाढली. या दरम्यान कंपनीने १,१०,१४७ कार विकल्या तर गेल्या वर्षी याच अवधीत ९२,१४० कारची विक्री झाली होती. २०१४ मध्ये देशातील बाजारपेठेत १७ टक्के विक्री वाढून ती १,००,०२४ कार झाली.
ह्युंदाई मोटार इंडियाच्या विक्रीत नोव्हेंबर २०१४ मध्ये ८.७ टक्क्यांची वाढ होऊन ५४,०११ कारची विक्री झाली. नोव्हेंबर २०१३ मध्ये ४९,६८१ कार विकण्यात आल्या होत्या.
जनरल मोटार्सच्या वाहन विक्रीत नोव्हेंबरमध्ये तब्बल ३३.१ टक्क्यांनी घट होऊन ४,१५७ कार विकल्या गेल्या, तर गेल्यावर्षी त्या ६,२१४ विकल्या गेल्या होत्या. या कालावधीत कंपनीने चिलीला १५० कार निर्यात केल्या. महिंद्रा अँड महिंद्राच्या वाहन विक्रीत नोव्हेंबर महिन्यात १३ टक्क्यांची घट होऊन ३४,२९२ कारची विक्री झाली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ३९२५४ कार विकल्या गेल्या होत्या. देशातील बाजारपेठेत विक्री ११ टक्के घटून ३२,१०० विकल्या गेल्या.
(वृत्तसंस्था)