शहीद स्मारकाची दुरवस्था

By Admin | Updated: August 8, 2015 00:23 IST2015-08-08T00:23:50+5:302015-08-08T00:23:50+5:30

शहीद स्मारकाची दुरवस्था

Martyrs Memorial Disease | शहीद स्मारकाची दुरवस्था

शहीद स्मारकाची दुरवस्था

ीद स्मारकाची दुरवस्था
स्मारकाला पडल्या भेगा : टाईल्सही उखडल्या
नागपूर :
९ ऑगस्ट हा क्रांती दिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो. या दिवशी देशासाठी शहीद झालेल्या क्रांतिवीरांचे बलिदान आणि त्यागाच्या स्मृती जागविल्या जातात. ऑगस्ट क्रांती दिवसाच्या स्मृतिप्रीत्यर्थ इतवारी शहीद चौक परिसरात स्मारक उभारण्यात आले होते. परंतु या स्मारकाकडे कमालीचे दूर्लक्ष झाल्याने स्मारकाची दुरवस्था झालीआहे.
स्मारकाच्या टाईल्समध्ये जागोजागी भेगा पडल्या आहेत. स्मारकाजवळ पसरलेले टाईल्सचे तुकडे शहिदांच्या उपेक्षांची कहाणी स्वत:च सांगताहेत. विशेष म्हणजे येथील शहीद स्मारक हे महात्मा गांधीजींच्या बलिदानाच्या स्मृतीत बनविण्यात आले होते. यानंतर या ठिकाणी भगतसिंह, चंद्रशेखर आझाद, राजगुरु, सुखदेव, सुभाषचंद्र बोस, पं. जवाहरलाल नेहरू, अबुल कलाम आझाद, आचार्य कृपलानी, आदींचा उल्लेखही करण्यात आला आहे. परंतु आज या स्मारकाच्या चारही बाजूंचे शिलालेख अस्पष्ट दिसून येतात.
१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी महापालिका शाळेतील काही विद्यार्थी येथे येऊन प्रार्थना आणि राष्ट्रगीत सादर करतात. या दिवशी परिसराची साफसफाई केली जाते. परंतु वर्षभर मात्र या स्मारकाकडे दुर्लक्षच असते.
महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, अबुल कलाम आझाद, आचार्य कृपलानी आदींच्या संदर्भात शिलालेखावर हिंदी आणि उर्दूमध्ये लिहिण्यात आलेले चार शब्द नष्ट होत असतानाही प्रशासनाचे लक्ष याकडे आतापर्यंत का गेले नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Martyrs Memorial Disease