शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 05:42 IST

दहशतवाद्यांचा शोध सुरू असून, अनेक जण चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पूंछ भागात शनिवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान विकी पहाडे मंगळवारी आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी घरी परतणार होते. ते मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील नोनिया-करबल गावचे रहिवासी होते. दरम्यान, दहशतवाद्यांचा शोध सुरू असून, अनेक जण चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत.

विकी पहाडे गेल्या महिन्यात त्यांच्या बहिणीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी घरी परतले होते. तेव्हाच त्यांची कुटुंबीयांशी भेट झाली होती. त्यानंतर ते १८ एप्रिल रोजी आपल्या तुकडीत पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले होते, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. शनिवारी पूंछमध्ये आयएएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पहाडे शहीद झाले तर इतर पाच आयएएफ जवान जखमी झाले. पहाडे यांच्या पश्चात पत्नी, पाच वर्षांचा मुलगा, आई आणि तीन बहिणी असा परिवार आहे.

हवाई दलाची श्रद्धांजलीविकी पहाडे (३३) हे २०११ मध्ये भारतीय हवाई दलात (आयएएफ) रुजू झाले होते. भारतीय हवाई दलाच्या अधिकृत एक्स हँडलवर हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी आणि हवाई दलाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

दुसऱ्या दिवशीही शोधमोहीमnदहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू आहे. अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. nलष्कराने हेलिकॉप्टर वापरून हवाई देखरेखही केली. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी शाहसीतार, गुरसाई, सनई आणि शेंदरा टॉप यासह अनेक भागात लष्कर आणि पोलिसांची सुसंघटित संयुक्त मोहीम सुरू आहे.

वर्षातील पहिली मोठी घटना : हल्ल्यानंतर हल्लेखोर जंगलात पळून गेल्याचे समजते. त्यांनी  अमेरिका निर्मित एम-४ कार्बाइन व स्टीलच्या गोळ्यांचा वापर केला. ही या वर्षातील जम्मू प्रदेशातील पहिली मोठी दहशतवादी घटना आहे.

टॅग्स :MartyrशहीदTerror Attackदहशतवादी हल्ला