मंगल कार्यालय दुर्घटना, चौकशीचे आदेश
By Admin | Updated: May 12, 2017 00:45 IST2017-05-12T00:45:21+5:302017-05-12T00:45:21+5:30
राजस्थानातील मंगल कार्यालय दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. भरतपूर येथे खुल्या मंगल कार्यालयाची भिंत कोसळून बुधवारी २४ ठार, ३० जण जखमी झाले होते.

मंगल कार्यालय दुर्घटना, चौकशीचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
जयपूर : राजस्थानातील मंगल कार्यालय दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. भरतपूर येथे खुल्या मंगल कार्यालयाची भिंत कोसळून बुधवारी २४ ठार, ३० जण जखमी झाले होते.
राजस्थान सरकारने या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी कार्यालय मालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, तो फरार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले असून, मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांच्या सानुग्रह अनुदानाची घोषणा केली. भरतपूर येथील सेवार रोडवर बुधवारी ही दुर्घटना घडली. सोसाट्याचा वारा व पाऊस यामुळे १२ फूट उंचीची भिंत कोसळली आणि विवाह सोहळ््याला आलेले अनेक पाहुणे ढिगाऱ्याखाली दबले. हे मंगल कार्यालय महापालिकेच्या परवानगीविना चालविले जात होते. दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी तीन स्वतंत्र समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.