विवाहित आमदार १८ वर्षीय मुलीसोबत पळाला..
By Admin | Updated: January 28, 2016 17:58 IST2016-01-28T17:58:55+5:302016-01-28T17:58:55+5:30
बिहारमध्ये एक विवाहित आमदार एका १८ वर्षीय मुलीला घेऊन पळाला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघामध्ये प्रेमसंबध आहेत की अजून काय ?

विवाहित आमदार १८ वर्षीय मुलीसोबत पळाला..
>ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. २८ - बिहारमध्ये एक विवाहित आमदार एका १८ वर्षीय मुलीला घेऊन पळाला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघामध्ये प्रेमसंबध आहेत की अजून काय ? पाटणा जवळील विक्रम विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार सिद्धार्थ सिंह आज सकाळी १८ वर्षीय मुलीला घेऊन पळाले, सिद्धार्थ सिंह हे विवाहित असून त्यांना एक मुलगा देखिल आहे. त्यांच्या विरोध पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलीस सुत्राकडून मिळालेल्या माहीतीप्रमाणे राजधानीततील शिशु रोग विशेषज्ञ डॉ. उत्पलकांत यांचा मुलगा आणि काँग्रेस आमदार सिंह मसौढ़ी येथून सकाळी १८ वर्षीय मुलीसोबत पळाले आहेत. त्यांच्यासोबत सिंह यांचा सरकारी बॉडीगार्ड आणि त्यांचे ५ सुरक्षारक्षक आहेत. मुलीच्या वडीलांनी सिंह यांच्या विरोधात अपहरण केल्याची तक्रार दाखल केली आहे.