विवाहितेचा छळ; पतीविरुद्ध गुन्हा नोंद
By Admin | Updated: December 20, 2014 22:28 IST2014-12-20T22:28:10+5:302014-12-20T22:28:10+5:30
गारगोटी : माहेरहून ५० हजार रुपये आणण्यासाठी विवाहितेच्या शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती विलास शंकर कांबळे (वय ४०, रा. दोनवडे, ता. भुदरगड) यांच्यावर भुदरगड पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

विवाहितेचा छळ; पतीविरुद्ध गुन्हा नोंद
ग रगोटी : माहेरहून ५० हजार रुपये आणण्यासाठी विवाहितेच्या शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती विलास शंकर कांबळे (वय ४०, रा. दोनवडे, ता. भुदरगड) यांच्यावर भुदरगड पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याबाबत भुदरगड पोलिसांतून समजलेली माहिती अशी : सौ. उज्ज्वला विलास कांबळे (वय २५, सध्या रा. हेदवडे, ता. भुदरगड) या विवाहितेने भुदरगड पोलिसांत तक्रार दिली असून, पतीने व्यापार सुरू करण्यासाठी माहेरहून ५० हजार रुपये घेऊन यावेत, यासाठी वळोवेळी शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून उपाशीपोटी ठेवून घरातून हाकलून दिले. सातत्याने शारीरिक व मानसिक छळ केला, अशी तक्रार केली आहे.याप्रकरणी भुदरगड पोलिसांनी पती विलास शंकर कांबळे यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास सहायक फौजदार एस. आय. पाटील करीत आहेत.