विवाहितेच्या प्रियकराला बदडले
By Admin | Updated: February 8, 2016 22:55 IST2016-02-08T22:55:19+5:302016-02-08T22:55:19+5:30
जळगाव- शहरातील एका विवाहितेच्या श्रीरामपूर येथील प्रियकराला या विवाहितेच्या पती व इतरांनी चांगलाच चोप दिला. सोमवारी सायंकाळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयासमोर हा प्रकार झाला. प्रियकराला काही रिक्षाचालकांनी वाचविले. तर संबंधित महिलेस जिल्हा पेठ पोलिसात नेण्यात आले.

विवाहितेच्या प्रियकराला बदडले
ज गाव- शहरातील एका विवाहितेच्या श्रीरामपूर येथील प्रियकराला या विवाहितेच्या पती व इतरांनी चांगलाच चोप दिला. सोमवारी सायंकाळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयासमोर हा प्रकार झाला. प्रियकराला काही रिक्षाचालकांनी वाचविले. तर संबंधित महिलेस जिल्हा पेठ पोलिसात नेण्यात आले. शहरातील एका महिलेचा पहिला विवाह मोडला होता. तिने दुसरा विवाह शहरातच वास्तव्यास असलेल्या एका युवकासोबत केला. त्यांना दोन मुली झाल्या. या दुसर्या पतिला सोडून संबंधित महिला काही दिवसांपासून शहरात भाड्याने खोली घेऊन राहत होती. तर दोन्ही मुली तिच्या पतिकडे राहत होत्या. सकाळीच पतिला भेटली, सायंकाळी प्रियकरासोबत आढळलीमहिला सोमवारी सकाळी पतिला भेटली. त्याच्याकडून तिने आजारपणाचे नाव सांगून पैसे आणले व ती सायंकाळी प्रियकरासोबत आढळली, असा आरोप तिच्या पतीने केला. प्रियकरास मारहाणसायंकाळी महिला व तिचा श्रीरामपूरचा प्रियकर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेजवळील पावभाजीच्या गाडीनजीक होते. ते महिलेच्या पतीला दिसले. पती त्यांच्याकडे दाखल झाला. त्यासोबत काही युवकही होते. त्यांनी प्रियकराला बेदम मारहाण केली. यानंतर वाहतूक शाखेचे कर्मचारी घटनास्थळी आले. त्यांनी जिल्हा पेठ पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी वाहनातून संबंधित महिलेस पोलीस ठाण्यात नेले. या प्रकरणी कुठलीही नोंद पोलिसात नव्हती.