नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेला १४ हजार कोटी रुपयांना फसविणारा कुख्यात हिरे व्यापारी नीरव मोदी याने कॅनडातील एका तरुणाला खोटे हिरे असलेल्या अंगठ्या विकल्या. त्यामुळे या तरुणाचे लग्न मोडले आहे. या तरुणाला नीरव मोदीने २ लाख डॉलरला चुना लावला आहे.‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार, पॉल अलफोन्सो असे याचे नाव आहे. २0१२ मध्ये बेव्हर्ली हिल्स हॉटेलच्या शतकमहोत्सवी समारंभात पॉलची नीरवशी ओळख झाली. यंदाच्या एप्रिलमध्ये पॉलने आपल्या एंगेजमेंटसाठी मोदीकडे किमती हिºयाच्या अंगठीची आॅर्डर दिली होती.
नीरव मोदीने दिलेल्या खोट्या हिऱ्यांमुळे मोडले तरुणाचे लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 05:00 IST