शेजबाभूळगाव येथे विवाहितेची आत्महत्या
By Admin | Updated: April 4, 2015 01:54 IST2015-04-04T01:54:59+5:302015-04-04T01:54:59+5:30

शेजबाभूळगाव येथे विवाहितेची आत्महत्या
>वाचली नाही...मोहोळ : मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून 22 वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शेजबाभूळगाव येथे 30 मार्च रोजी घडली़ मात्र 3 एप्रिल रोजी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आह़ेपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेजबाभूळगाव येथील संजय देवकर याच्याबरोबर लक्ष्मी देवकर हिचा तीन वर्षापूर्वी विवाह झाला होता़ लग्नानंतर पती संजय सोमा देवकर व नणंद सुशीला सखराम चव्हाण यांनी तूला मूल होत नाही म्हणून त्रास देत होत़े या त्रासाला कंटाळून लक्ष्मी देवकरने 30 मार्च रोजी शेजबाभूळगाव येथील बसाटे यांच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली़ याप्रकरणी पती व नणंद या दोघांवर गुन्हा दाखल झाला आह़े (वार्ताहर)