मैसूरच्या युवराजाचा शाही थाटात विवाह
By Admin | Updated: June 27, 2016 18:40 IST2016-06-27T18:40:10+5:302016-06-27T18:40:10+5:30
मैसूरच्या राजघराण्याचे युवराज यदुवीर क्रिष्णदत्ता चामराजा वडीयार यांचे शाही लग्न पार पडले. राजस्थानच्या त्रिशीका कुमारी सिंग या राजकुमारीसोबत ऐतिहासिक अम्बा विलास पॅलेसमध्ये

मैसूरच्या युवराजाचा शाही थाटात विवाह
ऑनलाइन लोकमत
मैसूर, दि. २७ - मैसूरच्या राजघराण्याचे युवराज यदुवीर क्रिष्णदत्ता चामराजा वडीयार यांचे शाही लग्न पार पडले. राजस्थानच्या त्रिशीका कुमारी सिंग या राजकुमारीसोबत ऐतिहासिक अम्बा विलास पॅलेसमध्ये हा विवाह सोहळा पार पडला. वडियार राजघराण्यात ४० वर्षांनंतर हा विवाहसोहळा पार पडला.
राजस्थानमधील डुंगरपूर राजघराण्यातील हर्षवर्धन सिंग याच्या त्रिशीका कुमारी या राजकुमारीसोबत ऐतिहासिक म्हैसूर राजघराण्याचे युवराज यदुवीर यांचा विवाह करण्याचे गेल्यावर्षी मे महिण्यात निश्चित झाले होते. त्यानुसार सोमवारी सकाळी हा शाही विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर त्यांची राजघराण्यातील राजगुरुंच्या हस्ते पूजा करुन विधी पार पाडण्यात आले. दरम्यान या शाही विवाह सोहळ्याला राजघराण्यातील नामांकीत व्यक्तींसह राजघराण्यातील व्यक्ती उपस्थित होत्या.