शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

Marital Rape: संसदेत उपस्थित झाला "मॅरिटल रेप"चा मुद्दा, स्मृती इराणींनी दिले स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 18:03 IST

Marital Rape: 'वैवाहिक जीवनातील लैंगिक हिंसेचे समर्थन केले जाऊ शकत नाही. परंतु त्याच्या नावाखाली सर्व पुरुषांना बलात्कारी म्हणणे योग्य नाही.'

नवी दिल्ली: देशात अनेकदा उद्भवणाऱ्या कथित वैवाहिक बलात्काराच्या (Marital Rape) प्रकरणांवर सरकारने पुन्हा एकदा आपले मत स्पष्ट केले आहे. या मुद्द्यावर बुधवारी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. संसदेत सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2022 वरील चर्चेदरम्यान स्मृती इराणी म्हणाल्या की, वैवाहिक जीवनातील लैंगिक हिंसेचे समर्थन केले जाऊ शकत नाही. परंतु त्याच्या नावाखाली सर्व पुरुषांना बलात्कारी म्हणणे देखील योग्य नाही.

महिलांसाठी हेल्पलाइन सुरूसीपीआय खासदार बिनॉय विश्वम (CPI MP Binoy Vishwam)  यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात वैवाहिक जीवनातील लैंगिक हिंसा, या विषयावर प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना स्मृती इराणी म्हणाल्या की, सध्या संपूर्ण भारतात 30 हून अधिक हेल्पलाइन महिलांशी संबंधित बाबींमध्ये मदत करण्यासाठी कार्यरत आहेत. या हेल्पलाइन्सच्या माध्यमातून 66 लाखांहून अधिक महिलांना मदत करण्यात आली आहे.

प्रकरण न्यायालयातत्या पुढे म्हणाले की, देशातील महिलांना मदत करण्यासाठी 703 'वन स्टॉप सेंटर' देखील कार्यरत आहेत. या माध्यमातूनही 5 लाख महिलांना मदत करण्यात आली आहे. वैवाहिक बलात्काराचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात विचाराधीन असल्याचे त्यांनी सीपीआय खासदाराला सांगितले. त्यामुळे सरकार या विषयावर फारशी चर्चा करू शकत नाही.

लग्नावरचा विश्वास मोडेल

भाजप नेते सुशील मोदी यांनीही यावेळी चर्चेत भाग घेतला आणि सरकारने वैवाहिक बलात्काराला गुन्ह्याच्या क्षेणीत टाकण्याचा निर्णय घेतल्यास लग्नावरचा विश्वास उडेल, असे म्हटले. पत्नीची सहमती कधी होती आणि कधी नव्हती, हे सिद्ध करणे कठीण आहे. त्यामुळे असे कायदे बनवणे अवघड असल्याचे मत त्यांनी मांडले.

स्मृती इराणींचे स्पष्टीकरण

यादरम्यान वाद वाढत असल्याचे पाहून खासदार बिनॉय विश्वम म्हणाले की, प्रत्येक पुरुष बलात्कारी आहे असे नाही. पण, सरकार या मुद्द्यावर राज्यांकडून डेटा गोळा करुन लवकरात लवकर संसदेत सादर करू शकते का ? यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की, केंद्र सरकार या सभागृहात राज्य सरकारांना अशी कोणतीही शिफारस करू शकत नाही. 

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीCentral Governmentकेंद्र सरकार