मोदी सरकारविरुद्ध काँग्रेसचा राष्ट्रपती भवनावर आज मार्च
By Admin | Updated: November 3, 2015 02:11 IST2015-11-03T02:11:56+5:302015-11-03T02:11:56+5:30
देशात असहिष्णु वातावरण निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न होत असून, याविरुद्ध काँग्रेस पक्षातर्फे मंगळवारी राष्ट्रपती भवनापर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे. तीस जानेवारी

मोदी सरकारविरुद्ध काँग्रेसचा राष्ट्रपती भवनावर आज मार्च
नवी दिल्ली : देशात असहिष्णु वातावरण निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न होत असून, याविरुद्ध काँग्रेस पक्षातर्फे मंगळवारी राष्ट्रपती भवनापर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे. तीस जानेवारी मार्ग येथून निघणाऱ्या या पदयात्रेचे नेतृत्व काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी करतील. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मोदी सरकारविरुद्ध नवी आघाडी उघडणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.
मार्चद्वारे वाढत्या असहिष्णुतेमुळे देशातील सर्वसामान्य जनतेत निर्माण झालेली भीती आणि साहित्यिक, बुद्धिजीवी, शास्त्रज्ञ यांच्याकडून व्यक्त होणारा असंतोष याकडे प्रामुख्याने राष्ट्रपतींचे लक्ष वेधले जाईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)