मराठी शाळांनी गुणवत्ता वाढीसाठी जाणिवपूर्वक प्रयत्न हवेत : शेजवळ
By Admin | Updated: December 16, 2014 23:53 IST2014-12-16T23:44:14+5:302014-12-16T23:53:58+5:30
वडणगे निगवे येथील कार्यशाळा उत्साहात

मराठी शाळांनी गुणवत्ता वाढीसाठी जाणिवपूर्वक प्रयत्न हवेत : शेजवळ
वडणगे निगवे येथील कार्यशाळा उत्साहात
16एमएपी01
वडणगे - निगवे (ता. करवीर) येथील श्री ज्योतिर्लिंग विद्यामंदिर येथे आयोजित एक दिवसीय गुणवत्तावाढ शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी विचार मांडताना स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विद्या समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र शेजवळ. शेजारी उपस्थित मान्यवर.
वडणगे : बदलत्या युगाच्या स्पर्धेत टिकायचे असेल, तर मराठी माध्यमांच्या शाळांनी गुणवत्ता वाढीसाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विद्या समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र शेजवळ यांनी केले.
करवीर तालुक्यातील वडणगे - निगवे येथील श्री ज्योतिर्लिंग विद्यामंदिर येथे एक दिवसीय गुणवत्ता वाढ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अर्थसहसचिव प्राचार्य पी. एस. चव्हाण होते.
या शिबिरात इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती गुणवत्ता वाढ यासंबंधी एस. जी. खताळ, विजय एकशिंगे, असिफ पठाण, जी. सी. धांदोरे, आर. एच. कावळे, व्ही. एल. शेवाळे यांनी विचार मांडले. या शिबिराचा स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळांतील सुमारे १५० शिक्षकांनी लाभ घेतला.
श्रीराम साळुंखे यांनी प्रास्ताविक, संयम हुकिरे यांनी सूत्रसंचालन, तर मुख्याध्यापक डॉ. व्ही. जी. कुलकर्णी यांनी आभार मानले.