आरोपी बनविण्याला मारन बंधूंचे आव्हान
By Admin | Updated: March 16, 2015 23:40 IST2015-03-16T23:40:10+5:302015-03-16T23:40:10+5:30
माजी दूूरसंचारमंत्री दयानिधी मारन आणि त्यांचे बंधू कलानिधी मारन यांनी सोमवारी स्वतंत्र याचिका दाखल करीत विशेष २ जी न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रालाच आव्हान दिले आहे.

आरोपी बनविण्याला मारन बंधूंचे आव्हान
हरीश गुप्ता ल्ल नवी दिल्ली
माजी दूूरसंचारमंत्री दयानिधी मारन आणि त्यांचे बंधू कलानिधी मारन यांनी सोमवारी स्वतंत्र याचिका दाखल करीत विशेष २ जी न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रालाच आव्हान दिले आहे. एअरसेल-मॅक्सिस सौद्याप्रकरणी या न्यायालयाने मारन बंधूंना समन्स पाठविले होते.
विशेष सीबीआय न्यायाधीश ओ.पी. सैनी यांनी मारन बंधूंच्या याचिकेवर सीबीआयला ३ आॅगस्ट रोजी उत्तर मागितले असून त्याच दिवशी सुनावणी निश्चित केली आहे.
न्यायालयाने मलेशियन व्यावसायिक टी. आनंद कृष्णन, आॅगस्टस राल्फ मार्शल आणि अन्य कंपन्यांना नव्याने समन्स जारी केले आहे. या सर्वांकडे समन्स पोहोचले नसून समन्स दूतावासामार्फत पाठवावे लागतील. त्यासाठी किमान तीन महिन्यांची मुदत हवी आहे, असे सरकारी वकील के.के. गोयल यांनी न्यायालयाला सांगितले होते.
काय आहेत आरोप
२००६ मध्ये चेन्नईतील दूरसंचार प्रवर्तक सी. शिवशंकरन यांनी एअरसेल व तिच्या दोन शाखांमधील आपले शेअर्स मलेशियाच्या मॅक्सिस समूहाला विकावे यासाठी दयानिधी मारन यांनी दबाव आणला होता, असा आरोप सीबीआयने केला. मारन बंधूंसह सन डायरेक्ट टीव्ही प्रा. लिमिटेडचे अधिकृत प्रतिनिधी न्यायालयात हजर होते. यापूर्वी गेल्या वर्षी २९ आॅक्टोबर रोजी सर्व आठही आरोपींना समन्स जारी केले होते. सीबीआयने गेल्या वर्षी २९ आॅगस्ट रोजी गुन्हेगारी कट आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार आरोपपत्र दाखल केले आहे.
त्यात १५१ साक्षीदारांची नावे असून तपासाच्या आधारावर ६५५ दस्तऐवज गोळा केले आहेत.