मारन यांची पुन्हा चौकशी?

By Admin | Updated: July 5, 2015 23:27 IST2015-07-05T23:27:33+5:302015-07-05T23:27:33+5:30

माजी दूरसंचार मंत्री दयानिधी मारन यांनी २२ तासांच्या चौकशीत अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याचे टाळत सीबीआयशी असहकार पुकारल्याने त्यांना पुन्हा पाचारण केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Maran again questioned? | मारन यांची पुन्हा चौकशी?

मारन यांची पुन्हा चौकशी?

नवी दिल्ली : माजी दूरसंचार मंत्री दयानिधी मारन यांनी २२ तासांच्या चौकशीत अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याचे टाळत सीबीआयशी असहकार पुकारल्याने त्यांना पुन्हा पाचारण केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मारन यांनी दूरसंचार मंत्री असताना आपल्या निवासस्थानी उच्च क्षमतेच्या बीएसएनएलच्या लाईन्स जोडल्या होत्या. बंधू कलानिधी मारन यांच्या मालकीच्या सन टीव्हीला वेगवान प्रसारण करता यावे हा त्यामागचा उद्देश होता. ४८ वर्षीय मारन यांनी संपुआ-१ मध्ये २००४ ते ०७ या काळात दूरसंचार मंत्री असताना पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. गेल्या बुधवारपासून सुरू झालेली त्यांची चौकशी २२ तास चालली.
मारन यांनी दिलेल्या उत्तरांची शहानिशा केली जात असून आढावा घेतल्यानंतर त्यांना पुन्हा बोलावले जाऊ शकते. आपण दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या(ट्राय)कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले नसल्याचा दावा मारन यांनी केला आहे.(वृत्तसंस्था)

Web Title: Maran again questioned?