ईशरत जहाँप्रकरणातील अनेक कागदपत्रे गायब - राजनाथ सिंह
By Admin | Updated: March 10, 2016 13:58 IST2016-03-10T13:55:33+5:302016-03-10T13:58:26+5:30
इशरत जहाँ प्रकरणातील अनेक कागदपत्रे गायब असल्याचे सांगत आधीच्या काँग्रेस सरकारने याप्रकरणी कोलांट्याउड्या मारल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत केला

ईशरत जहाँप्रकरणातील अनेक कागदपत्रे गायब - राजनाथ सिंह
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - इशरत जहाँ प्रकरणातील अनेक कागदपत्रे गायब असल्याचे सांगत आधीच्या काँग्रेस सरकारने याप्रकरणी कोलांट्याउड्या मारल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत केला. केंद्र सरकारने आपलं पहिलं प्रतिज्ञापत्र बदललं आणि दहशतवादासारख्या गंभीर मुद्यावर राजकारण केल्याचा आरोप करतानाच राजनाथ सिंह यांनी तत्कालिन गृह सचिव व सीबीआयने अॅटर्नी जनरलना लिहिलेली महत्त्वाची पत्रे गायब असल्याची माहिती संसदेत दिली.
ईशरत जहाँ ही निरपराध होती असा दावा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता. मात्र, डेव्हिड हेडलीच्या साक्षीनं तसेच नंतर गृहसचिवांनी व अंडर सेक्रटरींनी केलेल्या खुलाशानंतर ईशरत जहाँप्रकरणी नरेंद्र मोदींना लक्ष्य करण्यासाठी पी. चिदंबरम यांनी तथ्यांची उलटापालट केल्याचा आरोप विविध स्तरांवर झाला. खासदार किरीट सोमय्या यांनी हा मुद्दा संसदेत काढल्यानंतर या सगळ्या प्रकरणाची व्यापक व सखोल चौकशी होण्याची गरज असल्याचे मत राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले आहे.