शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली भाजपा प्रदेशाध्यक्षांवर हल्ला, थोडक्यात बचावले मनोज तिवारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2017 08:42 IST

भाजपाचे नवी दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्यावर अज्ञात लोकांनी हल्ला केला आहे. काल शनिवारी त्यांच्यावर एका कार्यक्रमात हा  हल्ला झाला. या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले आहेत

नवी दिल्ली, दि. 20 -  भाजपाचे नवी दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्यावर अज्ञात लोकांनी हल्ला केला आहे. काल शनिवारी त्यांच्यावर एका कार्यक्रमात हा  हल्ला झाला. या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले आहेत. या सर्व घटनेची पोलिस चौकशी करत आहेत. भाजपा प्रवक्ताने दिलेल्या माहितीनुसार, बवाना येथील निवडणुक प्रचाराच्या बैठकत प्रचार करत असताना मनोज तिवारी यांच्यावर काही अज्ञांत लोकांनी हल्ला केला. मनोज तिवारी यांच्यावर दगडफेक आणि लाकडाच्या दांड्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. विरोधकांना त्यांचा पराभव समोर दिसत असल्यामुळे त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोपही भाजपाच्या प्रवक्याने केला आहे. या हल्ल्यातून मनोज तिवारी सुखरुप बचावले आहेत. 

डीसीपी ऋषिपाल सिंह यांनी सांगितले की, शनिवारी रात्री मनोज तिवारी यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची माहिती मिळाली.  मिळालेल्या माहितीनुसार तिवारी यांच्यावर लाकडाच्या तुकडे आणि दगडफेक केली. या सर्व घटनेची पोलिसांमध्ये तक्रार आली असून अज्ञांतावर गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळाच्या मिळालेल्या व्हिडिओ फुटेजनुसार या घटनेची चौकशी सुरु आहे.  

23 ऑगस्ट रोजी बवानामध्ये निवडणुका होत आहेत. त्यासाठी प्रत्येक पक्ष आपली ताकद पणाला लावून प्रचार करत आहेत. या जागेसाठी भाजपाकडून वेद प्रकाश मैदानात आहेत. वेद प्रकाश यांनी आम आदमी पार्टीमधून भाजपात प्रवेश केला आहे.  

दरम्यान , मनोज तिवारी यांच्यावर हल्ला होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी दिल्लीतील 159 नॉर्थ अव्हेन्यू परिसरात खासदार मनोज तिवारी यांच्या घरावर हल्लेखोरांनी हल्ले केले आहेत. खासदार तिवारी हे घरी नव्हते, यावेळी हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात २ जण गंभीर झाले. दरम्यान याबाबतची माहिती खासदार तिवारी यांनी ट्विट करुन दिली होती. खासदार तिवारी यांनी हा हल्ला म्हणजे मोठा कट असून या हल्ल्यात पोलिसांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोपही ट्विटद्वारे केला. तर घटनास्थळावर उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी हल्ला का झाला हे सांगता येत नाही, मात्र हल्लेखोर घाण शिव्या देत होते. त्यांना पोलिसांची भीती नसल्याचेही त्यांच्या बोलण्यावरुन वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :PoliceपोलिसBJPभाजपा