मनोहरलाल खट्टर यांनी घेतली हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
By Admin | Updated: October 26, 2014 12:18 IST2014-10-26T12:16:00+5:302014-10-26T12:18:19+5:30
पहिल्यांदाच आमदार झालेले मनोहरलाल खट्टर यांनी रविवारी हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

मनोहरलाल खट्टर यांनी घेतली हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
ऑनलाइन लोकमत
पंचकुला, दि. २६ - पहिल्यांदाच आमदार झालेले मनोहरलाल खट्टर यांनी रविवारी हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. खट्टर यांच्यासोबत रामविलास शर्मा, कॅप्टन अभिमन्यू, ओमप्रकाश धनखड, अनिल वीज, कविता जैन आणि नरवीर सिंह यांनीदेखील कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. खट्टर हे हरियाणाचे १० वे मुख्यमंत्री बनले आहेत.
हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाने ९० पैकी ४७ जागांवर विजय मिळवून पहिल्यांदाच हरियाणामध्ये स्वबळावर सत्तास्थापन केली आहे. विशेष बाब म्हणजे जाट समाजाचे वर्चस्व असलेल्या हरियाणामध्ये यंदा प्रथमच पंजाबी असलेले मनोहरलाल खट्टर यांची मुख्यमंत्रीपदावर वर्णी लागली. ६४ वर्षीय खट्टर हे पूर्वी संघाचे प्रचारक होते. नरेंद्र मोदींमुळे राजकारणात आलेले खट्टर यंदा प्रथमच करनाल विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. पंचकुला येथे रविवारी खट्टर यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. खट्टर यांच्या मंत्रिमंडळात जाट, गैर जाट, बनिया या समाजातील नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. खट्टर यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज, भाजपाशासीत राज्यांचे मुख्यमंत्री आदी नेते मंडळी उपस्थित होते.