मनोहरलाल खट्टर यांची हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदी निवड
By Admin | Updated: October 21, 2014 14:30 IST2014-10-21T13:32:05+5:302014-10-21T14:30:29+5:30
भारतीय जनता पक्षाने मनोहर लाल खट्टर यांची हरियाणाच्या मुख्यमंत्री म्हणून निवड केली आहे.

मनोहरलाल खट्टर यांची हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदी निवड
>ऑनलाइन लोकमत
चंदीगड, दि. २१ - काँग्रेसला धूळ चारत हरियाणात सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असणा-या भारतीय जनता पक्षाने मनोहरलाल खट्टर यांची हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदासाठी निवड केली आहे. भाजपा आमदारांच्या बैठकीनंतर मंगळवारी ही घोषणा करण्यात आली.
आपल्या ४० वर्षांच्या सार्वजनिक-राजकीय जीवनात कर्नालमधून पहिलीच निवडणूक लढवून प्रचंड मताधिक्याने विजयी झालेले खट्टर हे जाटबहुल हरियाणातील बिगर-जाट पंजाबी समाजातून आलेले आहेत. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारकही आहेत. खट्टर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू मानले जातात. ते अविवाहीत असून त्यांची प्रतिमा स्वच्छ नेत्याची आहे.