मनोहर पर्रीकरांनी फडकावला आजपर्यंतचा सर्वात मोठा तिरंगा
By Admin | Updated: January 23, 2016 19:55 IST2016-01-23T15:42:04+5:302016-01-23T19:55:08+5:30
देशातला सगळ्यात मोठा तिरंगा ध्वज आज संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याहस्ते फडकवण्यात आला.

मनोहर पर्रीकरांनी फडकावला आजपर्यंतचा सर्वात मोठा तिरंगा
>ऑनलाइन लोकमत
रांची, दि. २३ - देशातला सगळ्यात मोठा तिरंगा ध्वज आज संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याहस्ते फडकवण्यात आला. नेताजी सुभाषचंद्र बोसांची ११९वी जयंती साजरी करताना हा मान मला मिळाला यामुळे समाधान वाटत असल्याची भावना पर्रीकर यांनी व्यक्त केली आहे.
या तिरंग्याची उंची ६६ फूट तर लांबी ९९ फूट असून २९३ फूट उंच खांबावर तो फडकावण्यात आला. आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा तिरंगा ६४ फूट उंच व ९६ फूट लांबीचा होता, जो गेल्या वर्षी फरीदाबादमध्ये २५० फूट उंच खांबावर फडकावण्यात आला. झारखंडचे मुख्यमंत्री रघूबर दास, राज्यपाल द्रौपदी मुरमू, अन्य मंत्री व मान्यवर यावेळी उपस्थित होते.