शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

'...तेव्हा पर्रीकरांनी माझ्यासह गडकरींनाही धक्का दिला'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 12:24 IST

ज्येष्ठ आमदारानं सांगितली पर्रीकरांची आठवण

पणजी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बहुतेकवेळा माझ्याच बैठका झाल्या. कारण मी गोव्याचा सार्वजनिक बांधकाम मंत्री होतो. बहुतेक बैठकांना पर्रीकर येतदेखील नव्हते. त्यांनी पहिल्याच बैठकीत माझ्यासह गडकरींनाही आश्चर्याचा धक्का दिला, असे माजी बांधकाम मंत्री व मगो पक्षाचे विद्यमान ज्येष्ठ आमदार सुदिन ढवळीकर यांनी शनिवारी 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीवेळी सांगितले.गडकरी दोन दिवसांपूर्वी गोव्यात पणजीच्या पोटनिवडणूक प्रचाराला आले होते. त्यावेळी गडकरी यांनी पणजीत जाहीर सभेवेळी काही विधाने केली. ढवळीकर हे एरव्ही कधीच गडकरी यांना प्रत्युत्तर देत नव्हते. पण गडकरी यांच्या विधानांच्या अनुषंगाने ढवळीकर प्रथमच बोलले. आपल्याला व गडकरी यांना पर्रीकर यांनी बैठकीत कसे आश्चर्यचकित केले ते आपण सांगतो, म्हणजे उर्वरित विषयाची कल्पना अनेकांना येईल, असे ढवळीकर म्हणाले. गोव्यात 2012 साली भाजपाप्रणीत आघाडीचे सरकार आले. त्या सरकारमध्ये मी बांधकाम मंत्री झालो. मी त्यावेळी केंद्रातील यूपीए सरकारकडे गोव्यातील साधनसुविधांसाठी शेकडो कोटी रुपयांचे प्रस्ताव घेऊन गेलो होतो. पण त्या प्रस्तावांवर काँग्रेसप्रणीत आघाडी सरकारने मोठे निर्णय घेतले नाहीत. फक्त दोन प्रकल्पांची निविदा प्रक्रिया सुरू केली होती, असे ढवळीकर यांनी सांगितले.'2014 साली केंद्रात मोदी सरकार आले आणि गडकरी भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग बांधकाम मंत्री झाले. मला पर्रीकर यांनी गडकरी यांच्याकडे पाठवले. मी गडकरींकडे गेलो व जुन्या प्रस्तावांचा पाठपुरावा केला. गडकरी मदतीसाठी तयार झाले. त्यानंतर मी, गडकरी व पर्रीकर अशी एकत्र आणि महत्त्वाची बैठक झाली. त्या बैठकीवेळी पर्रीकर यांनी गोव्यातील सर्व राष्ट्रीय महामार्गावरील कामे गोवा सरकार करेल', असे गडकरी यांना सांगितले. महामार्गाचे रुंदीकरण, चौपदरीकरण, सहा पदरीकरण, महामार्गावर पूल बांधणे, उड्डाण पूल व बायपास बांधणे ही सगळी कामे गोवा सरकार स्वत:च्या तिजोरीतून करेल, असे पर्रीकर यांनी गडकरी यांना सांगून आश्चर्याचा धक्का दिला'. 'अचानक पर्रीकर बैठकीत तसे बोलले व त्यांनी लगेच केंद्राने त्यासाठी ना हरकत दाखला द्यावा अशीही विनंती गडकरी यांना केली. मलाही आश्चर्य वाटले. राष्ट्रीय महामार्ग हे केंद्राच्या अखत्यारित येतात अणि गोवा सरकार शेकडो कोटींचा निधी राष्ट्रीय महामार्गावर कसा म्हणून खर्च करू शकेल असा प्रश्न मला व गडकरींना पडला. शेवटी पर्रीकर यांच्या आग्रहामुळे गडकरींनी चोवीस तासांत ना हरकत दाखला दिला. मात्र काही महिन्यांनी पर्रीकर यांनी मला गडकरींकडे चला व गोव्यातील राष्ट्रीय महामार्गावरील सगळी कामे करून घेण्यासाठी केंद्राने निधी द्यावा अशी विनंती गडकरींना करा असे सांगितले. मी पुन्हा गडकरींकडे गेलो व उलटी प्रक्रिया सुरू करण्याची त्यांना विनंती केली. तुम्हीच निधी द्यावा अशी विनंती केली. ते हसले. मात्र मोठ्याय़ा मनाने गडकरी यांनी गोव्याला पंधरा हजार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला, असे ढवळीकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरNitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाGoa Lok Sabha Election 2019गोवा लोकसभा निवडणूक 2019