शहरं
Join us  
Trending Stories
1
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
2
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
3
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
4
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पीएम मोदींसोबतच्या बैठकीत पुतिन यांचे मोठे विधान, म्हणाले...
5
'या' ८ म्युच्युअल फंड्सनी दिले नेगेटिव्ह रिटर्न; 'या' क्षेत्रातील फंडांचा समावेश, कशी ओळखायची जोखीम?
6
Marnus Labuschagne : पिंक बॉल टेस्टमधील बेस्ट बॅटर! मार्नस लाबुशेनची विश्वविक्रमी कामगिरी
7
Bigg Boss 19: बॉलिवूड अभिनेत्रीचा प्रणित मोरेला जाहीर पाठिंबा; नेटकरी म्हणाले, 'मराठी कार्ड...'
8
अशीही आईची माया! जिच्या मुलीचा जीव घेतला, तीच आता 'सायको पूनम'च्या मुलाचा सांभाळ करणार
9
"मला खरंच वाटत नव्हतं.."; लग्न लांबणीवर पडल्यानंतर पहिल्यांदा स्मृती मंधानाची इन्स्टा पोस्ट
10
Flight Fare Hike: मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली...
11
“महायुती सरकारने एका वर्षाच्या कामाची श्वेतपत्रिका काढावी”; विजय वडेट्टीवार यांची मागणी
12
१०० वर्षांनी २ शत्रू ग्रहांचा समसप्तक योग: ७ राशींना लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा; मनासारखे घडेल!
13
शत्रूच्या घरात घुसून हेरगिरी करण्याचे मिशन, रणवीर सिंहचा 'धुरंधर' नक्की कसा आहे? वाचा रिव्ह्यू
14
आता 'झीरो बॅलन्स' खात्यातही मिळणार ATM, चेकबुकसह अनलिमिटेड सुविधा; RBI चे नवे नियम जाहीर
15
'धुरंधर'च्या क्लायमॅक्सची चर्चा, आता दुसरा भागही येणार; रिलीज डेटची अधिकृत घोषणा
16
संकटादरम्यान IndiGo नं ग्राहकांची मागितली माफी; रिफंड आणि फ्लाइट रीशेड्युल वर केली मोठी घोषणा
17
लिओनेल मेस्सी फुटबॉल विश्वचषकापूर्वी निवृत्त होणार? दिग्गज फुटबॉलरच्या 'या' विधानाने खळबळ
18
इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार
19
VIDEO : पांड्याचा स्वॅगच वेगळा! ज्यानं विकेट घेतली त्याच्या गळ्यात जाऊन पडला अन्...
20
नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला, पण...
Daily Top 2Weekly Top 5

Mann ki Baat : देश अनलॉक होऊ लागलाय, आता अधिक सावध राहण्याची गरज - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 12:01 IST

देशाच्या अर्थव्यवस्थेची चक्रे आता फिरू लागली असून, नागरिकांवरील बंधने आता हळूहळू कमी होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशवासियांनी अधिक सावध राहण्याची गजर आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.

नवी दिल्ली - तब्बल सव्वादोन महिने सुरू असलेल्या लॉकडाऊननंतर आता केंद्र सरकारने देशातील नागरिकांवर घालण्यात आलेले निर्बंध हटवण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित केले. देशाच्या अर्थव्यवस्थेची चक्रे आता फिरू लागली असून, नागरिकांवरील बंधने आता हळूहळू कमी होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशवासियांनी अधिक सावध राहण्याची गजर आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. 

यावेळी मोदीनी सांगितले की, मी गेल्या वेळी मन की बातच्या माध्यमातून जेव्हा संवाद साधला होता, तेव्हा देशातील बहुतांश व्यवहार बंद होते. मात्र आता देशाच्या अर्थव्यवस्थेचे चक्र पुन्हा एकदा फिरू लागले आहेत. सर्व खबरदारी घेऊन रेल्वे आणि विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता अनलॉक-१ च्या काळात आपल्याला अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. आता सहा फुटांचे अंतर आणि मास्क परिधान करणे गरजेचे आहे.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरही भाष्य केले. मोदी म्हणाले की, देशातील सामुहिक शक्तीमुळे देशात कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यात यश मिळाले आहे. आपल्या देशाची लोकसंख्या इतर देशांच्या तुलनेत अधिक आहे. मात्र आपल्याकडे कोरोना पसरलेला नाही. तसेच मृत्यूदरही मर्यादित राहिला आहे. नुकसान झालं त्याचं दु:ख आहेच, मात्र जे वाचवू शकलो, त्याबद्दल जनतेचे आभार, कारण हा लढा जननेतृत्वात सुरु आहे, कोरोनाविरोधातील लढाईत देशवासीयांच्या संकल्पशक्तीसोबतच सेवाशक्ती उपयुक्त ठरली आहे.

कोरोनाचा सर्वाधिक फटका देशातील गरीब आणि श्रमिकांना बसला आहे. त्यामुळे देशातील पूर्व भारतात यामुळे निर्माण झालेली दु:खद परिस्थिती तुम्ही पाहू शकता. त्यामुळे या भागात विकासकामांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. त्यासाठी काम सुरू झाले आहे. काही ठिकाणी श्रमिकांच्या स्कील मॅपिंगचे काम सुरू आहे. तर काही ठिकाणी स्टार्टअप कामाग गुंतले आहेत. तर कुठे मायग्रेशन कमीशन बनवण्यासाठी चर्चा सुरू आहे. त्यामुळे आत्मनिर्भर भारत अभियान या दशकामध्ये देशाला एका वेगळ्या उंचीवर  घेऊन जाईल, असा मला विश्वास आहे, असे मत मोदींनी यावेळी मांडले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बातIndiaभारतcorona virusकोरोना वायरस बातम्या