पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी लोकप्रिय 'मन की बात' या रिडिओवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. नव्या वर्षातील पहिल्या एपिसोडमध्ये पंतप्रधान मोदींनी वेगवेगळ्या विषयावर भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मन की बात' हा कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी रेडिओवरून प्रसारित केला जातो. पण यावेळी नव्या वर्षातील 'मन की बात' कार्यक्रमाचा ११८ वा एपिसोड हा एक आठवडा आधीच प्रसारित झाला. यामागचं कारणही एपिसोड एवढंच खास आहे. जाणून घेऊयात त्यामागचं कारण अन् पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या वर्षातील 'मन की बात' कार्यक्रमातील ४ प्रमुख मुद्दे
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
...म्हणून नव्या वर्षातील पहिला एपिसोड शेवटच्या रविवार ऐवजी आधी प्रसारित झाला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मन की बात' या रेडिओवरील कार्यक्रमाचा ११८ वा भाग हा जानेवारीच्या तिसऱ्या रविवारी प्रसारित झाला. एरव्ही पंतप्रधान मोदी महिन्याच्या अखेरच्या रविवारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधतात. पण या महिन्यात रविवारी प्रजासत्ताक दिन आहे. याच खास कारणामुळेच मोदींनी यावेळी एक आठवडा आधीच 'मन की बात'च्या माध्यमातून देशवासिंयाशी संवाद साधला.
मी संविधान सेभेतील सर्व महापुरुषांना वंदन करतो...
'मन की बात' कार्यक्रमात मोदींनी वेगवेगळ्या विषयावर भाष्य केले. यंदाचा प्रजासत्ताक दिन खास आहे. देशात संविधान लागू होऊन ७५ वर्षे होत आहेत. त्यामुळे ७५ वा प्रजासत्ताक दिन खास ठरतो. या निमित्तानं संविधान सेभेतील सर्व महापुरुषांना मी वंदन करतो. ज्यांनी देशाला पवित्र संविधान दिले, असे मोदींनी म्हटले आहे.
PM मोदींनी निवडणूक आयोगाचेही मानले आभार
पीएम मोदी यांनी यावेळीच्या कार्यक्रमात निवडणूक आयोगाचेही आभार मानले. ते म्हणाले की, "२५ जानेवारीला नॅशनल वोटर्स डे (National Voters' Day) आहे. याच दिवशी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली. संविधान निर्माणकर्त्यांनी लोकशाहीच्या दृष्टीने देशाच्या संविधानात निवडणुक आयोगाला मोठं स्थान दिले आहे. निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी मतदान प्रक्रियेत बदल करून ही प्रणाली अधिक मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. त्याबद्दल मी निवडणूक आयोगाचेही आभार मानतो, असे ते म्हणाले.
महाकुंभमेळ्यावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
'मन की बात' कार्यक्रमात मोदींनी महाकुंभमेळ्यावरही भाष्य केले. "प्रयागराज येथून महाकुंभमेळ्याचा श्री गणेशा झाला आहे. मोठ्या संख्येन लोक यात सहभागी झाले आहेत. कल्पनेपलिकडचे दृश्य समता-समरसता याचे अद्भूत संगम दर्शविणारे आहे. यावेळी कुंभमेळ्यात अनेक दिव्य योगायोगही जुळून येत आहेत. हजारो वर्षांपासून सुरु असलेली ही परंपरा भारतीय लोकांना भारतीय परंपरेशी जोडते"
सॅटेलाइट्समधील भरारीवरही केलं भाष्य
बंगळुरूच्या Startup Pixxel नं भारताचा पहिला Private Satellite तयार करून इतिहास रचला. तंत्रज्ञान क्षेत्रातील या या ऐतिहासिक क्षणाचा उल्लेखही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमात केला. हा क्षण देशासाठी अभिमानास्पद होता. हे Satellite constellation जगातील सर्वात High-Resolution Hyper Spectral Satellite Constellation आहे, असे सांगत मोदींनी सॅटेलाइट्समधील भरारीवर भाष्य केले.