शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

परदेशात जाऊन लग्न करणाऱ्यांवर पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले; सांगितलं, कसं होतंय भारताचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 15:10 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशात जाऊन लग्न करणाऱ्यांवर मोठे भाष्य केले आहे...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' कार्यक्रमाच्या माध्यमाने जनतेशी संवाद साधला. 'मन की बात' कार्यक्रमाचा आजचा 107वा अॅपिसोड होता. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी 'मन की बात' कार्यक्रम ब्रॉडकास्ट होतो. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, परदेशात जाऊन लग्न करणाऱ्यांवरही भाष्य केले. "आपण विचार करा की, सध्या काही कुटुंबांमध्ये परदेशात जाऊन विवाह करण्याचे जे एक वातावरण तयार होत आहे, हे आवश्यक आहे का?" असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

भारतीय उत्पादनांप्रति असलेली आपली भावना सण, उत्सवांपूरतीच मर्यादीत नसावी -पंतप्रधान मोदी म्हणाले, भारतीय उत्पादनांप्रति असलेली आपली भावना केवळ सण आणि उत्सवांपूरतीच मर्यादीत नसावी, तर आता लग्नसराईचा काळही सुरू झाला आहे. काही व्यापरी संघटनांच्या मते या लग्नसराईच्या काळात जवळपास 5 लाख कोटी रुपयांचा व्यापार होऊ शकतो. लग्नाशी संबंधित खरेदीमध्येही आपण सर्वांनी भारतात तयार झालेल्या उत्पादनांनाच प्राधान्य द्यायला हवे. आणि हो, लग्नाचाच विषय निघाला आहे, तर एक गोष्ट मला बऱ्याच दिवसांपासून कधी-कधी  त्रास देते आणि माझ्या मनातील गोष्ट, मी माझ्या कुटुंबासोबत बोलणार नाही, तर कुणाशी बोलणार?

देशाबाहेर जाऊन लग्न करणे आवश्यक आहे का? -"आपण विचार करा की, सध्या काही कुटुंबांमध्ये परदेशात जाऊन विवाह करण्याचे जे एक वातावरण तयार होत आहे, हे आवश्यक आहे का? भारताच्या मातीत आणि भारतीय लोकांमध्ये आपण लग्न केले, तर देशातील पैसा देशातच राहील. देशातील लोकांना आपल्या लग्न समारंभात काही तरी करायची संधी मिळेल. छोटे-छोटे गरीब लोकही त्यांच्या मुलांना आपल्या लग्नातील गोष्टी सांगतील," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 नोव्हेंबरच्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात भाष्य करत, या हल्ल्यातील मृतांना आणि हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. याच बरोबर, संविधान दिनानिमित्त देशवासियांना शुभेच्छाही दिल्या. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीmarriageलग्नMan ki Baatमन की बात