शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: पंतप्रधानपदाची जबाबदारी मनमोहन सिंग यांनी शिकवू नये, भाजपाचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 06:59 IST

म्हटले आहे की, डॉ. सिंग यांनी पंतप्रधान असताना ‘संपुआ’ सरकारच्या काळात त्या पदाच्या प्रतिष्ठेला पद्धतशीरपणे कमीपणा आणला गेला होता.

नितीन अग्रवाल नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी पंतप्रधानपदाची जबाबदारी काय असते, हे सोडून अन्य विषयांवर आपली विद्वत्ता दाखवावी, असा खरमरीत प्रतिटोला भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोमवारी लगावला. चीनच्या कुटिलतेस चुकूनही बळ मिळेल, असे वक्तव्य करण्याचे टाळावे, असा सल्ला डॉ. सिंग यांनी पंतप्रधान मोदी यांना दिल्यानंतर नड्डा यांनी अनेक टष्ट्वीट करून त्यावर ही प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले आहे की, डॉ. सिंग यांनी पंतप्रधान असताना ‘संपुआ’ सरकारच्या काळात त्या पदाच्या प्रतिष्ठेला पद्धतशीरपणे कमीपणा आणला गेला होता.भाजप अध्यक्षांनी म्हटले आहे की, काँग्रेस सातत्याने आपल्या सैन्यदलांची मानखंडना करत आला आहे. ज्या काँग्रेसने भारताचा ४३ हजार चौ. किमीचा भूप्रदेश चीनच्या घशात घातला, त्याच पक्षाचे डॉ. सिंग नेते आहेत. डॉ. सिंग यांनी स्वत: पंतप्रधान असताना चीनच्या कुटिल नीतीची चिंता केली असती तर अधिक चांगले झाले असते. ते पंतप्रधान असताना २०१०-१३ या काळात भारताच्या हद्दीत ६०० वेळा राजरोसपण घुसखोरीझाली होती. स्वत: डॉ.सिंग यांनी पंतप्रधान या नात्याने देशाची शेकडो चौरस किमी भूमी कोणताही प्रतिकार न करता चीनला देऊन टाकलीहोती.>हा तर निव्वळ शब्दांचा खेळडॉ. सिंग यांचे निवेदन म्हणजे निव्वळ शब्दांचा खेळ आहे, असा आरोप करून नड्डा यांनी पुढे म्हटले की, आताची वेळ संपूर्ण देशाने एकजूट राखण्याची आहे, हे डॉ. सिंग यांचे म्हणणे अगदी बरोबर आहे.पण देशातील ऐक्याच्या वातावरणास नेमके कोण सुरुंग लावत आहे, हे पाहिल्यास डॉ. सिंग यांचे हे शब्द म्हणजे निव्वळ कागदी घोडे आहेत, हे लगेच दिसेल. डॉ. सिंग यांनी राष्ट्रीय एकजुटीचा सल्ला निदान स्वत:च्या पक्षाला दिला तर बरे होईल.

टॅग्स :Indiaभारतchinaचीन