शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

मनमोहनसिंग यांचा राज्यसभेसाठी राजस्थानातून उमेदवारी अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 07:04 IST

माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांंनी मंगळवारी राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी राजस्थानमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. राज्यातील जनतेच्या भल्यासाठी प्रयत्न करील, अशी ग्वाही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

जयपूर : माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांंनी मंगळवारी राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी राजस्थानमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. राज्यातील जनतेच्या भल्यासाठी प्रयत्न करील, अशी ग्वाही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली.राज्यसभेच्या राजस्थानमधील रिक्त जागोसाठी उमेदवारी दिल्याबद्दल त्यांनी काँग्रेस पक्ष, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि काँग्रेसच्या सर्व सदस्यांचे आभार मानले. राजस्थान विधानसभेतील निर्वाचन अधिकाऱ्यांच्या कक्षात त्यांनी उमेदवारी अर्जाचे चार संच दाखल केले. भाजपचे नेते मदनलाल  सैनी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांच्या कुुटुबियांप्रती मनमोहनसिंग यांनी सहवेदना व्यक्त केल्या. जूनमध्ये सैनी यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली होती.

उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री गेहलोत, उपमुख्यमंत्री पायलट, अ.भा. काँग्रेसचे सरचिटणीस व राज्याचे प्रभारी अविनाश पांडे, विधिमंडळ कामकाजमंत्री शांती धारीवाल, मुख्य प्रतोद महेश जोशी, आरोग्यमंत्री रघू शर्मा आदी उपस्थित होते. मनमोहनसिंग यांच्या अनुभवाचा काँग्रेसला फायदा होईल. राजस्थानमधील रिक्त जागेसाठी काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली, याचा आनंद वाटतो. मनमोहनसिंग यांना खासदार करण्याची राजस्थानमधील काँग्रेसच्या आमदारांना, काँग्रेसजनांना संधी मिळणार असल्याचा मला आनंद वाटतो, असे सचिन पायलट म्हणाले.

मनमोहनसिंग हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून, १९९१ ते २०१९ पर्यंत सलग पाच वेळा ते राज्यसभेचे सदस्य होते, तर २००४ ते २०१४ यादरम्यान सलग दोनदा देशाचे पंतप्रधान होते. यावर्षी १४ जून रोजी त्यांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपली होती.

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंगRajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूकRajasthanराजस्थान