शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

मनमोहन सिंग यांच्या समाधीसाठी जागा द्यावी, काँग्रेस अध्यक्षांचे पंतप्रधान मोदींना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 19:25 IST

Manmohan Singh Death: उद्या, (28 डिसेंबर 2024) राजघाटजवळ डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

Manmohan Singh Death: भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी(26 डिसेंबर 2024) वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले. दिल्लीतील एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या(28 डिसेंबर 2024) सकाळी त्यांच्यावर दिल्लीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे, मनमोहन सिंग यांच्या समाधीसाठी जागा देण्याची मागणी केली आहे.

मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार करणे आणि त्यांचे स्मारक उभारणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे आवाहन मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांच्याशी फोनवर बोलून आणि पत्र लिहून केले आहे.

मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सकाळी काँग्रेस कार्यालयात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. सामान्यांना काँग्रेस कार्यालयात मनमोहन सिंग यांचे शेवटचे दर्शन करता येईल. दरम्यान, आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी मनमोहन सिंग यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली वाहिली.

मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहताना पंतप्रधान मोदींनी त्यांचे निधन हे देशाचे मोठे नुकसान असल्याचे वर्णन केले. तसेच, एक दयाळू माणूस, एक विद्वान अर्थशास्त्रज्ञ आणि आर्थिक सुधारणांद्वारे देशाला एका नव्या युगात घेऊन जाणारे नेते, म्हणून त्यांचे स्मरण केले. 

टॅग्स :Manmohan Singhडॉ. मनमोहन सिंगMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेNarendra Modiनरेंद्र मोदी