शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

आई-वडील मजूर; गरिबी, उपासमारीशी झुंज देत 'तो' झाला शिक्षक, गावाला वाटतोय अभिमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 16:14 IST

मंजयचं कुटुंब अत्यंत गरिबीत जीवन जगतात. त्याचे वडील परमेश्वर सदा पंजाबमध्ये मजूर म्हणून काम करतात, तर त्याची आई भुखानी देवी गावात इतरांच्या शेतात काम करते.

दरभंगा जिल्ह्यातील परमार गावातील मंजय लाल सदा य़ाने गरिबी आणि अनेक आव्हानांचा सामना करत बीपीएससी शिक्षक पात्रता परीक्षा (टीआरई) उत्तीर्ण केली आहे. मंजय हा त्याच्या गावातील इंटरमिजिएट उत्तीर्ण होऊन सरकारी नोकरी मिळवणारा पहिला व्यक्ती ठरला आहे. त्याच्या यशाचा केवळ त्याच्या कुटुंबालाच नाही तर संपूर्ण गावाला अभिमान वाटत आहे. 

मंजयचं कुटुंब अत्यंत गरिबीत जीवन जगतात. त्याचे वडील परमेश्वर सदा पंजाबमध्ये मजूर म्हणून काम करतात, तर त्याची आई भुखानी देवी गावात इतरांच्या शेतात काम करते. पाच भावंडांपैकी मंजय याने आपलं शिक्षण पूर्ण केलं. उर्वरित भाऊ आणि बहिणींना आर्थिक अडचणींमुळे शाळा सोडावी लागली. माती आणि बांबूपासून बनवलेल्या कच्च्या घरात राहणारा मंजय जुन्या सायकलवरून शाळेत जाऊ लागला. ही सायकल त्याच्या संघर्षात त्याची सोबती होती.

मंजयने गावातील परमार माध्यमिक शाळेतून आठवीपर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर, त्याने दरभंगाच्या आनंदपूर स्कूलमधून इंटरमिजिएट उत्तीर्ण झाला. आपल्या छोट्या खर्चासाठी तो मुलांना शिकवायचा. अडचणी असूनही, त्याने आपला अभ्यास सुरू ठेवला आणि पहिल्याच प्रयत्नात बीपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाली, परंतु एका गुणाने त्याची निवड होऊ शकली नाही. दुसऱ्यांदा कठोर परिश्रम करून त्याने टीआरई परीक्षा उत्तीर्ण केली आणि सरकारी शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण केलं.

मंजयची आई भुखानी देवी म्हणाल्या, गरिबी आणि उपासमारीशी झुंज देऊनही मी माझ्या मुलाला शिक्षण दिलं. आज तो शिक्षक झाला आहे, यापेक्षा मोठा आनंद काय असू शकतो. गावात सगळे एकत्र राहत होतो, पण जास्तीचे पैसे कमवण्यासाठी नवरा पंजाबमध्ये मजूर म्हणून काम करतो. बीपीएससीचा निकाल पाहिल्यानंतर, मंजय आणि त्याची आई दोघेही खूप भावनिक झाले आणि खूप रडू लागले.

मंजय म्हणाला, "मी गरिबी खूप जवळून पाहिली आहे. गावातील मुलांना त्यांच्या अभ्यासात मदत करण्याचं माझं स्वप्न आहे. मी त्यांना अभ्यास करण्यास प्रवृत्त करेन." मंजयची गोष्ट लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी आहे ज्यांना कठीण परिस्थितीशी झुंजत आपलं स्वप्न पूर्ण करत आहेत. त्याच्या यशाने हे सिद्ध केलं की, शिक्षण ही अशी शक्ती आहे जी कोणतीही परिस्थिती बदलू शकते. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी