शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मणिशंकर, पाकिस्तानचा काँग्रेसला फटका! दुसऱ्या फेरीतील मतदानात भाजपाला झाला बंपर लाभ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2017 14:50 IST

गुजरात विधानसभा निवडणुकीत अँटी इन्कम्बन्सीचा सामना करत भाजपाने आपली सत्ता राखण्यात यश मिळवले. राहुल गांधींचा धडाकेबाज प्रचार, हार्दिक पटेल जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांनी उघडलेली आघाडी यामुळे भाजपासाठी सत्ता राखणे कठीण बनले होते.

अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीत अँटी इन्कम्बन्सीचा सामना करत भाजपाने आपली सत्ता राखण्यात यश मिळवले. राहुल गांधींचा धडाकेबाज प्रचार, हार्दिक पटेल जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांनी उघडलेली आघाडी यामुळे भाजपासाठी सत्ता राखणे कठीण बनले होते. मात्र पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या अखेरीस मणिशंकर अय्यर यांनी मोदींबाबत केलेले नीच प्रकारचा माणूस हे वक्तव्य आणि मोदींनी पाकिस्तानी अधिकाऱ्यांसोबत काँग्रेसच्या नेत्यांच्या झालेल्या तथाकथित बैठकीची पुडी काँग्रेसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करून गेली. गुजरात विधानसभेतील सध्या येत असलेल्या कलांवरून भाजपाने स्पष्ट बहुमतासह सत्ता राखल्याचे स्पष्ट होत आहे. पहिल्या टप्प्यात झालेल्या 89 आणि दुसऱ्या टप्प्यात झालेल्या 93 मतदारसंघांमधील निकालांमधून पहिल्या टप्प्यात काँग्रेसला तर दुसऱ्या टप्प्यात भाजपाला फायदा झाल्याचे स्पष्ट होत आहे. गुजरात विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यामध्ये 89 जागांसाठी मतदान झाले होते. त्या मतदारसंघांमध्ये सध्या येच असलेल्या कलांनुसार भाजपाला 48 जागा तर काँग्रेसला 41 जागा मिळाल्या होत्या. पहिल्या टप्प्यामधील मतदानात काँग्रेसला भाजपापेक्षा केवळ 7 जागा कमी मिळाल्या होत्या. दुसऱ्या टप्पात झालेल्या 93 मतदारसंघातील मतदानामध्ये मणिशंकर अय्यर यांचे वक्तव्य, पाकिस्तानचा मुद्दा यांचा लाभ भाजपाला झाल्याचे दिसत आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये झालेल्या मतदानात भाजपाला मोठी आघाडी मिळताना दिसत आहे. दुसऱ्या टप्प्यात मतदान झालेल्या 93 मतदारसंघांपैकी तब्बल 61 जागांवर भाजपा आघाडीवर आहे. तर काँग्रेसला केवळ 30 जागांवर आघाडी मिळत असल्याचे दिसत आहे. 182 जागांसाठी गुजरातमध्ये दोन टप्प्यांत सरासरी 68.41 टक्के मतदान झाले होते. 68 जागांसाठी हिमाचल प्रदेशात 75 टक्के मतदान झाले होते. गुजरातच्या 33 जिल्ह्यांतील 37 केंद्रांवर मतमोजणी होत आहे. 

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017GujaratगुजरातMani Shankar Aiyarमणीशंकर अय्यर