अरविंद केजरीवाल यांनी मनीष सिसोदियांकडे उपमुख्यमंत्रिपदासह सोपवली मोठी जबाबादारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 06:00 PM2020-02-17T18:00:52+5:302020-02-17T18:42:29+5:30

Manish Sisodia : आम आदमी पक्षाच्या दुसऱ्या कार्यकाळात मनीष सिसोदिया यांनी आपली कार्यक्षमता दाखवून दिली होती.

Manish Sisodia will be the Deputy Chief Minister & allocated Education, Finance Departments | अरविंद केजरीवाल यांनी मनीष सिसोदियांकडे उपमुख्यमंत्रिपदासह सोपवली मोठी जबाबादारी 

अरविंद केजरीवाल यांनी मनीष सिसोदियांकडे उपमुख्यमंत्रिपदासह सोपवली मोठी जबाबादारी 

Next

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी रविवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यांच्यासोबत इतर सहा सहकारीसुद्धा शपथबद्ध झाले होते. दरम्यान, केजीवाल सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून, केजरीवाल यांनी आपले विश्वासू सहकारी असलेल्या मनीष सिसोदिया यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदासह अन्य महत्त्वपूर्ण अशी खाती सोपवली आहेत. 

आम आदमी पक्षाच्या दुसऱ्या कार्यकाळात मनीष सिसोदिया यांनी आपल्या कार्याची छाप पाडली होती. दरम्यान, नव्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे शिक्षण, वित्त, नियोजन, बांधकाम, पर्यंटन, सेवा, कला, सांस्कृतिक आणि भाषा ही खाती सोपवण्यात आली आहेत.

  

राजधानी दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात रविवारी पुन्हा एकदा आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन झाले. केजरीवाल यांच्यासोबत दिल्ली सरकारच्या ६ मंत्र्यांनी यावेळी शपथ घेतली. मात्र या नव्या मंत्रिमंडळात जुन्याच मंत्र्यांनी शपथ घेतली होती. आपच्या नवीन मंत्रीमंडळात नवीन चेहऱ्यांचा समावेश होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. या नव्या चेहऱ्यांमध्ये राघव चढ्ढा आणि आतिशी मार्लेना यांच्या नावांचा समावेश होता. मात्र आज झालेल्या शपथविधीत पुन्हा एकदा जुन्याच मंत्र्यांनी शपथ घेतली.



दिल्लीचे  मनीष सिसोदिया यांनी पटपडगंज विधानसभा मतदार संघातून विजय मिळविला होता. या विधानसभा निवडणुकीत मनीष सिसोदिया यांनी भाजपाचे उमेदवार रविंदर सिंह नेगी यांचा पराभव केला. मात्र  विजय मिळवण्यासाठी सिसोदिया यांना शेवटपर्यंत झुंज द्यावी लागली होती. मतमोजणीच्या सुरुवातीच्या अनेत फेऱ्यांमध्ये सिसोदिया हे पिछाडीवर होते. मात्र अखेरच्या फेऱ्यांमध्ये पिछाडी भरून काढत त्यांनी विजय मिळवला होता. 

महत्त्वाच्या बातम्या 

बिहारमध्ये केजरीवालांच्या साथीत प्रशांत किशोर यांचा राजकीय प्रयोग ?

केजरीवालांचे कौतुक करण्यावरून काँग्रेस नेते ट्विटरवर भिडले; 'आप'मध्ये जाण्याचा दिला सल्ला

केजरीवालांच्या शपथविधीत उपस्थित असलेल्या भाजपाच्या एकमेव आमदाराला मिळाले नाही आसन

 

Web Title: Manish Sisodia will be the Deputy Chief Minister & allocated Education, Finance Departments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.