शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

Manish Sisodia arrested : मद्य घोटाळ्यात उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांना अटक, 8 तासांच्या चौकशीनंतर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 20:00 IST

Manish Sisodia arrested : आज CBI ने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची 8 तास चौकशी केली.

Manish Sisodia arrested : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना कथित मद्य घोटाळ्यात अटक करण्यात आली आहे. अटकेपूर्वी सीबीआयने सिसोदिया यांची सुमारे 8 तास चौकशी केली होती. अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी सिसोदिया यांची सीबीआय कार्यालयात चौकशी झाली. सीएम अरविंद केजरीवाल आणि स्वतः सिसोदिया यांनी अटकेबाबत आधीच भीती व्यक्त केली होती. 

सीबीआय एफआयआरमधील आरोपी क्रमांक एक असलेल्या मनीष सिसोदिया यांची मागील वर्षी 17 ऑक्टोबर रोजी चौकशी करण्यात आली होती. एका महिन्यानंतर, 25 नोव्हेंबर रोजी सीबीआयने या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले. सीबीआयच्या आरोपपत्रात सिसोदिया यांचे नाव नव्हते, कारण त्यावेळी त्यांच्या आणि इतर संशयित आणि आरोपींविरुद्ध सीबीआयचा तपास चालू होता.

सीबीआयने रविवारी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या चौकशीची दुसरी फेरी सुरू केली. राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहल्यानंतर सिसोदिया सीबीआय कार्यालयात पोहोचले. तसेच, सिसोदिया यांच्या चौकशीच्या निषेधार्थ सीबीआय कार्यालयाजवळ निदर्शने करणाऱ्या आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह आणि मंत्री गोपाल राय यांच्यासह 50 जणांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले.

तुरुंगात जाणे वरदान आहे - केजरीवालसिसोदिया यांच्या चौकशीपूर्वी केजरीवाल यांनी ट्विट करून म्हटले की, 'मनीष, देव तुझ्या पाठीशी आहे. लाखो मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. देशासाठी आणि समाजासाठी तुरुंगात जाणे हा दुर्गुण नसून गौरव आहे. तू लवकरच तुरुंगातून परत येवो, अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो. दिल्लीची मुले, पालक आणि आम्ही सर्व तुमची वाट पाहत आहोत.' आणखी एका ट्विटमध्ये केजरीवाल यांनी लिहिले की, 'जे गरीब मुलांना चांगले शिक्षण देणारे आणि भविष्य घडवणारे तुरुंगात असतात आणि अब्जावधींचा घोटाळा करणारे पंतप्रधानांचे जवळचे मित्र बाहेर असतात.' 

'नाव - मनीष सिसोदिया आणि गुन्हा...' राघव चढ्ढा यांचे ट्विटआप नेते आणि राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी ट्विट केले की, 'नाव - मनीष सिसोदिया आणि गुन्हा - गरीबांच्या मुलांना उत्कृष्ट शिक्षण दिले. आज दिल्लीच्या सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या 18 लाख मुलांचे डोळे ओले झाले आहेत, कारण भाजप त्यांच्या लाडक्या मनीष काकांना अटक करत आहे. हे भाजप सरकार आहे, इथे लहान मुलांच्या हातात पुस्तके देणारा सर्वात मोठा गुन्हेगार मानला जातो.'

टॅग्स :Manish Sisodiaमनीष सिसोदियाArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपCBIगुन्हा अन्वेषण विभाग