शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

2 विद्यार्थ्यांच्या मृतदेहाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर मणिपूरमध्ये तणाव वाढला, CBIचे पथक दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 17:14 IST

Manipur Violence: मागील काही महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत होरपळत असलेल्या मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा पेटली आहे.

Manipur Clash: मागील काही महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत होरपळत असलेल्या मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा पेटली आहे. मणिपूरमधील दोन विद्यार्थ्यांचे अपहरण आणि हत्येनंतर हिंसा भडकली आहे. आता या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयचे पथक बुधवारी (27 सप्टेंबर) विशेष विमानाने इम्फाळला पोहोचले. या टीमचे नेतृत्व एजन्सीचे विशेष संचालक अजय भटनागर करत आहेत. वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार, बुधवारी इंफाळमधील सीएम सचिवालयापासून सुमारे 200 मीटर अंतरावर असलेल्या मोइरांगखोम येथे दगडफेक करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या गोळ्या झाडल्या. या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. जुलैमध्ये बेपत्ता झालेल्या दोन तरुणांच्या अपहरण आणि हत्येच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत विद्यार्थी सहभागी झाले होते. बेपत्ता तरुणाचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 'वुई वॉन्ट जस्टिस'च्या घोषणा देत विद्यार्थी मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या बंगल्याकडे जात होते. मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणीरॅलीचे नेतृत्व करणारे विद्यार्थी नेते लांथेंगबा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या दोन तरुणांची हत्या करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी केली. दोन्ही तरुणांच्या मारेकऱ्यांना 24 तासांच्या आत अटक करावी आणि त्यांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणावेत, अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान, काही विद्यार्थ्यांनी दगडफेक सुरू केल्याने परिस्थिती अचानक बिघडली. यानंतर पोलिसांनाही प्रत्युत्तर द्यावे लागले. मणिपूर अशांत राज्य म्हणून घोषितईशान्येकडील मणिपूर राज्यात परिस्थिती गंभीर झाल्याने राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. सरकारने संपूर्ण राज्य 'अशांत क्षेत्र' म्हणून घोषित केले आहे. तणावाची परिस्थिती पाहता इंटरनेट सेवादेखील बंद करण्यात आली आहे. हिंसाचाराच्या घटनांमध्ये घट झाल्यानंतर सरकारने अलीकडेच 23 सप्टेंबर रोजी मोबाइल इंटरनेट सेवा पूर्ववत केली होती. पण, पुन्हा एकदा हिंसेची आग वाढत चालली आहे. मणिपूरमधील वाढत्या तणावामुळे मंगळवारपासून पाच दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारCBIगुन्हा अन्वेषण विभागCrime Newsगुन्हेगारी