शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांच्या INDIA आघाडीचा मोठा निर्णय; पुढच्या आठवड्यात मणिपूरचा दौरा करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 18:43 IST

Manipur Violence: लवकरच मणिपूर दौऱ्याच्या तारखेची घोषणा होऊ शकते.

Manipur Violence: गेल्या अनेक महिन्यांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिसांचारामुळे विरोधक सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. यातच आता बुधवारी (19 जुलै) दोन महिलांना विविस्त्र करुन धिंड काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सरकारविरोधात संतापाची लाट आहे. दरम्यान, आता विरोधकांच्या 'इंडिया' (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स) आघाडीतील नेते पुढील आठवड्यात मणिपूरचा दौरा करू शकतात. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोमवारी (24 जुलै) सकाळी संसदेत विरोधी पक्षांच्या बैठकीत तारखेबाबत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही मणिपूरला जाण्याचे संकेत दिले आहेत. त्या इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत. त्यांची दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी मणिपूरला जाण्याबाबत चर्चा झाली आहे. 

अधिवेशनात विरोधकांचा गोंधळमणिपूर राज्यात सुरू असलेला हिंसाचार आणि महिलांसोबत घडलेल्या घटनेचे पडसाद संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पाहायला मिळत आहेत. विरोधक मणिपूरवर चर्चा घेण्याची मागणी करत असून, आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही दोन्ही सभागृहात गदारोळ पाहायला मिळाला. या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. 

चार जणांना अटकमणिपूरमध्ये बुधवारी दोन महिलांना विवस्त्र करुन धिंड काढल्याचा व्हिडिओ समोर आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण 4 मे चा आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. हुइरेम हेरादास सिंग(32) असे मुख्य आरोपीचे नाव आहे. या प्रकरणातील दोषींना सोडले जाणार नाही, असे राज्य आणि केंद्र सरकारने सांगितले आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारcongressकाँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जीlok sabhaलोकसभाBJPभाजपा