शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार; ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु होणार?
2
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
3
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
6
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
7
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
8
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
9
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
10
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
11
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
12
"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या
13
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
14
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
15
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
16
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
17
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
18
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
19
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
20
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स

मणिपूर हिंसाचारप्रकरणी सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये, शांतता समिती गठीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 16:54 IST

विविध जाती संघटनांमध्ये सामंजस्यपूर्ण संवाद साधता यावा, यासाठी शांतता समिती सामाजिक सलोखा आणि बंधुता वाढवण्यासाठीही प्रयत्न करणार आहे.

नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचार प्रकरणाबाबत (Manipur Violence) मोदी सरकार आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)  अ‍ॅक्शन मोडमध्ये आहेत. हिंसाचाराच्या प्रकरणी केंद्र सरकारने मणिपूरच्या राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली शांतता समिती (Peace Committee) स्थापन केली आहे. या समितीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांचाही समावेश असणार आहे. यासोबतच अनेक माजी नागरी सेवकांचाही या समितीत समावेश करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समितीच्या सदस्यांमध्ये मुख्यमंत्री, राज्य सरकारचे काही मंत्री, खासदार, आमदार आणि विविध राजकीय पक्षांचे नेते यांचा समावेश आहे. या समितीत माजी नागरी सेवक, शिक्षणतज्ज्ञ, साहित्यिक, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध जातीय समूहांच्या प्रतिनिधींचाही समावेश करण्यात आला आहे. राज्यातील विविध जातीय समूहांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याची प्रक्रिया सुलभ करणे, ज्यामध्ये विवादित पक्ष/गटांमधील शांततापूर्ण संवाद आणि वाटाघाटी यांचा समावेश आहे, हे समितीचे उद्दिष्ट असणार आहे.

विविध जाती संघटनांमध्ये सामंजस्यपूर्ण संवाद साधता यावा, यासाठी शांतता समिती सामाजिक सलोखा आणि बंधुता वाढवण्यासाठीही प्रयत्न करणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 29 मे 2023 ते 1 जून 2023 या कालावधीत मणिपूर राज्याचा दौरा केला होता आणि परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शांतता समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती. मणिपूरमध्ये अजूनही हिंसाचाराचा काळ सुरूच आहे. 

दरम्यान, शुक्रवारी सैनिकांच्या गणवेशात आलेल्या मैती समाजाच्या अतिरेक्यांनी आधी गावकऱ्यांना कोबिंगच्या बहाण्याने घराबाहेर बोलावले आणि नंतर त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. या गोळीबारात एका महिलेसह तीन जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे. मणिपूर हिंसाचाराचा तपास सीबीआय करत आहे. सीबीआयने आतापर्यंत सहा एफआयआर नोंदवले आहेत, ज्यामध्ये पाच गुन्हेगारी कटाशी संबंधित आहेत. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार