शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"महिलांवरील अत्याचार रोखायचे असतील तर..."; सुप्रिया सुळेंनी मांडली रोखठोक भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 16:59 IST

मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न अवस्थेत धिंड काढण्याचे प्रकरण सध्या चर्चेत

Manipur Controversy: मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढल्याची आणि त्यांच्यावर अत्याचार केल्याची किळसवाणी घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण देशातून याबाबत तीव्र पडसाद उमटत आहेत. लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या दरम्यान, घटेनेतील पीडित महिलांनी त्यांच्यासोबत झालेल्या क्रूरतेची कहाणीही सांगितली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला अल्टिमेटम दिला आहे. या मुद्द्यावर बोलताना, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी काय केले पाहिजे, याबाबत रोखठोक भूमिका मांडली.

जमावाने दोन महिलांची नग्नावस्थेत धिंड काढल्याच्या बातम्या समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्या आहेत. अशा घृणास्पद कृत्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्यासुप्रिया सुळे यांनी आपले मत व्यक्त केले. देशभरातील महिलांची सुरक्षा आणि सन्मान सुनिश्चित करण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलण्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार व कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी केली. समाजातील महिलांच्या संरक्षण आणि सक्षमीकरणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाम आहे. महिलांवरील हिंसाचार आणि भेदभावाच्या विरोधात लढण्यासाठी सर्व राजकीय पक्ष, सरकार, नागरी समाज यांनी एकत्र येऊन सामूहिक प्रयत्न करण्याचे आव्हान सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

धक्कादायक व्हिडिओबाबत देशभरातील नागरिकांकडून संताप आणि व्यापक निषेध व्यक्त केला आहे. महिलांवरील अशा भयंकर अत्याचारांकडे समाजाने प्रेक्षकाच्या भूमिकेत राहू नये व त्यावर सरकारला जाब विचारण्याची भूमिका समाजाने घेतली पाहिजे. महिलांच्या आत्मसन्मानाच्या रक्षणासाठी शासनाने कठोर पावलं उचलावी. तसेच भारतीय समाजाला या विषयावर सचेतन करण्याची आवश्यकता असल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी मांडली.

महिलांच्या प्रतिष्ठेचे आणि सुरक्षिततेचे संरक्षण हा जन्मजात मानवी हक्क आहे व यासोबत तडजोड केली जाऊ शकत नाही. अशा प्रकारच्या हिंसेमुळे आपल्या समाजाच्या नैतिक जडणघडणीला हरताळ फासला जातोच, पण जागतिक स्तरावर आपल्या देशाची प्रतिमाही कलंकित होते, असे तपासे म्हणाले.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेस