मणीपूरच्या विद्यार्थ्यांना ताजमध्ये प्रवेश नाकारला

By Admin | Updated: January 11, 2017 01:04 IST2017-01-11T01:04:52+5:302017-01-11T01:04:52+5:30

मणीपूरमधील केंद्रीय कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या एका समूहाला येथे ताजमहालमध्ये प्रवेश नाकारल्याचे प्रकरण समोर आले आहे.

Manipur students denied admission in the Taj | मणीपूरच्या विद्यार्थ्यांना ताजमध्ये प्रवेश नाकारला

मणीपूरच्या विद्यार्थ्यांना ताजमध्ये प्रवेश नाकारला

आग्रा : मणीपूरमधील केंद्रीय कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या एका समूहाला येथे ताजमहालमध्ये प्रवेश नाकारल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी पुरातत्व विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत.
सीआयएसएफच्या कर्मचाऱ्याने या विद्यार्थ्यांना राष्ट्रीयत्वाचे पुरावे मागितले. स्थानिक पोलिसांच्या मध्यस्थीनंतर या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. पण, नंतर या विद्यार्थ्यांनी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांवर भेदभावाचा आरोप करत लेखी
तक्रार दिली आहे. इंफाळच्या केंद्रीय कृषी विद्यापीठातील हे विद्यार्थी शैक्षणिक दौऱ्यांतर्गत येथे आले होते. रविवारी दुपारी ते ताजमहालला भेट देण्यासाठी आले होते.

Web Title: Manipur students denied admission in the Taj