शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 17:36 IST

Manipur Unrest 2026: मणिपूरने पुन्हा एकदा हिंसाचारामुळे लक्ष वेधून घेतले आहे. रॉकेट हल्ला आणि बॉम्बस्फोटानंतर हिंसेचा भडका उडाला असून, भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. हिंसाचाराचे काही व्हिडीओही समोर आले आहेत. 

Manipur News Today Marathi: शांतता स्थिरावू पाहत असलेल्या मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसेने पाऊल ठेवले. रॉकेट हल्ल्यानंतर झालेल्या स्फोटात दोन मुलांचा मृत्यू झाला. त्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये या हिसेंचे लोळ पोहोचले. काही तासांमध्येच परिस्थिती इतकी बिघडली की, पाच जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. या हिंसाचाराचे काही व्हिडीओही समोर आले आहेत. 

मणिपूरमधील मोइरांग पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ट्रोंगलाओबी अवांग लेइकाइमध्ये रात्री एक वाजता ही घटना घडल्याचे माहिती सूत्रांनी दिली. कुकी बंडखोरांनी एका घरावर रॉकेट डागले. हे रॉकेट एका घरावरच पडले आणि मोठा स्फोट झाला. त्यात एका ५ वर्षाच्या आणि एका ५ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला. नव्याने उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे.   मणिपूर हिंसाचार व्हिडीओ बघा

बिष्णुपूर जिल्ह्यात या घटनेनंतर लोक संतप्त झाले. लोक आक्रमक झाले. लोकांचा जमाव जेलमोल डोंगराजवळ असलेल्या सीआरपीएफच्या छावणीजवळ केला आणि त्यांनी आगी लावल्या. त्यानंतर गोळीबार झाल्याचेही आवाज व्हिडीओमध्ये येत आहेत.

गोळीबारात १९ आंदोलक जखमी 

पाच जिल्ह्यांमध्ये या हिंसेचे पडसाद उमटले आहेत. बिष्णुपूर जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासन आणि सुरक्षा जवानांकडून गोळीबार आणि अश्रू धुरांच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला. यात १९ लोक जखमी झाले आहेत. 

विष्णपूर जिल्ह्यात प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. संपूर्ण जिल्ह्यातील सुरक्षा वाढवण्यात आली आहेत. जवानांच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, अधिकाऱ्यांकडून शांतता राखण्याचे आवाहन लोकांना करण्यात येत आहे. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Manipur violence escalates: Rocket attack kills children, unrest spreads.

Web Summary : Manipur unrest returns after a rocket attack killed two children. Violence spread across districts, leading to internet shutdowns and curfews in Bishnupur. Security forces deployed to control the situation after protests and gunfire injured 19.
टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूFiringगोळीबार