मणिपूरचे मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह यांचा राजीनामा

By Admin | Updated: March 13, 2017 23:17 IST2017-03-13T23:11:20+5:302017-03-13T23:17:55+5:30

मणिपूरचे मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

Manipur Chief Minister Okram Ibobi Singh resigns | मणिपूरचे मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह यांचा राजीनामा

मणिपूरचे मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह यांचा राजीनामा

ऑनलाइन लोकमत
इंफाळ, दि. 13 - मणिपूरचे मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह यांनी मुख्यमंत्रिपदाचा सोमवारी रात्री उशिरा राजीनामा दिला. 
मणिपूर विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाने सरकार स्थापन करण्याचा दावा केला. त्यामुळे ओकराम इबोबी सिंह यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असे राज्यपाल नजमा हेमतुल्ला यांनी सांगितले होते. यावर, ओकराम इबोबी सिंह यांनी कॉंग्रेसकडे बहुमत असल्याचा दावा करत राजीनामा देण्यास नकार दिला होता. मात्र, त्यानंतर काही तासानंतर त्यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली.
ओकराम इबोबी सिंह यांनी राजीनामा दिल्याशिवाय नवीन सरकार स्थापनेची पुढील प्रक्रिया केली जाऊ शकत नाही. त्यामुळे ओकराम इबोबी सिंह यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास राज्यपालांनी सांगितले होते. यावेळी ओकाराम इबोबी सिंह यांनी काँग्रेसकडे बहुमताचा आकडा गाठण्याइतपत संख्याबळ असल्याचा दावा केला आणि पार्टीच्या 28 आमदारांची यादी दाखविली.तसेच, नॅशनल पीपल्स पार्टीचे (एनपीपी) चार आमदारांचे समर्थन असल्याचेही सांगितले.
यावर राज्यपालांनी एनपीपीच्या चार आमदारांची नावे साध्या कागदावर असल्यामुळे एनपीपीचे अध्यक्ष आणि निवडून आलेल्या सदस्यांना घेऊन येण्यास सांगितले. दरम्यान,  इतर पक्षांचा पाठिंबा मिळत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अखेर ओकाराम इबोबी सिंह यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. 
 
(मणिपूरच्या राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांचा मागितला राजीनामा)
 

Web Title: Manipur Chief Minister Okram Ibobi Singh resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.