शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक...! भाजप अल्पसंख्यक मोर्चाच्या नेत्यानं वक्फ कायद्याचं समर्थन केलं, जमावानं अख्खं घर पेटवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 11:58 IST

अली यांनी शनिवारी सोशल मीडियावर या कायद्याला पाठिंबा दर्शवला होता...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वक्फ (सुधारणा) विधेयक-2025 ला मंजुरी दिली आहे. यानतंर आता या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले आहे. गेल्या आठवड्यांत रात्री उशिरापर्यंत चर्चा  होऊन लोकसभा आणि राज्य सभेत हे विधेयक मंजूर झाले होते. हे विधेयक मंजूर झाल्यापासूनच मुस्लीम समाजाच्या एका वर्गात अद्यापही नाराजी दिसत आहे. यातच, गेल्य रात्री भाजपच्या एका नेत्याचे घर जाळण्याचा प्रकार घडला आहे. असगर अली असे या नेत्याचे नाव आहे. त्यांनी वक्फ सुधारणा कायद्याचे समर्थन करत केले होते. ते याच्या वैशिष्ट्यांसंदर्भात माहिती देत होते. 

मणिपूर भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष असगर अली यांचे घर जमावाने पेटवून दिले आहे. यासंदर्भात बोलताना अधिकाऱ्यानेम म्हटले आहे. की, ही घटना थौबल जिल्ह्यातील लिलोंग येथे घडली. तत्पूर्वी, अली यांनी शनिवारी सोशल मीडियावर या कायद्याला पाठिंबा दर्शवला होता.संबंधित अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रात्री 9 वाजण्याच्या सुमारास भडकलेला जमाव अली यांच्या घराबाहेर जमला. या जमावाने आधी त्यांच्या घराची तोडफोड केली आणि नंतर त्याला आग लाऊन दिली. या घटनेनंतर अली यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत, आपल्या मागिल विधानासंदर्भात माफी मागितली आहे. तसेच, या कायद्याप्रति त्यांनी विरोधही दर्शवला आहे. 

यापूर्वी, वक्फ सुधारणा कायद्या विरोधात इंफाळ खोऱ्यातील अनेक भागांत निदर्शनेही झाली. पाच हजारहून अधिक लोकांनी एका रॅलीत भाग घेतला होता. यामुळे राष्ट्रीय महामार्ग-102 वरील वाहतूकही विस्कळीत झाली होती. याच बरोबर, या कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका देखील सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. 

जमियत उलेमा-ए-हिंद (एएम) या मुस्लीम संघटनेने देखील वक्फ (दुरुस्ती) कायदा २०२५ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. यात, हे मुस्लिमांचे धार्मिक स्वातंत्र्य हिरावण्याचे एका षड्यंत्र असल्याचा दावा करण्यात आला आहे.

याशिवाय, काँग्रेस खासदार मोहम्मद जावेद, AIMIM अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आणि आप आमदार अमानतुल्लाह खानसह इतरही काही लोकांनी या विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हाण देणारी याचिका केल आहे. 

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डBJPभाजपाMuslimमुस्लीम